advertisement

लग्नाआधीच बिग बॉस फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, गेल्या वर्षी झालेला साखरपुडा, नेमकं काय घडलं?

Last Updated:
Pavitra Punia Wedding: गेल्या काही काळापासून पवित्राच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. पण, पवित्राने पुढच्या महिन्यात होणारं आपलं लग्न पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
1/9
मुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री 'बिग बॉस' फेम पवित्रा पुनिया सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. गेल्या काही काळापासून पवित्राच्या लग्नाची जोरदार चर्चा होती.

2/9
पवित्राने गेल्या वर्षीच आपल्या अमेरिकन बिझनेसमन मंगेतरसोबत साखरपुडा उरकला होता आणि ती लवकरच अमेरिकेत स्थायिक होणार होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

3/9
पवित्राने पुढच्या महिन्यात होणारं आपलं लग्न पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पवित्राच्या लग्नाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात होती.

4/9
खरेदीपासून ते पाहुण्यांच्या यादीपर्यंत सगळं काही फिक्स झालं होतं. मात्र, अचानक पवित्राच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

5/9
HY City ने दिलेल्या वृत्तानुसार, पवित्राच्या आजीचं डिसेंबर २०२५ मध्ये निधन झालं. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून अशा परिस्थितीत कोणताही सोहळा साजरा करणं कोणालाच पटणारं नव्हतं. त्यामुळेच पवित्रा आणि तिच्या सासरच्या मंडळींनी मिळून लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे.

6/9
स्वतः पवित्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की,
स्वतः पवित्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, "दुर्दैवाने हो, माझं लग्न पुढे ढकललं गेलं आहे. नानीच्या निधनामुळे आम्ही किमान ६ महिने कोणताही मोठा सोहळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या धक्क्यातून सावरायला आम्हाला थोडा वेळ हवा आहे."
advertisement
7/9
पवित्राच्या मते, नवीन तारखा अद्याप निश्चित झाल्या नाहीत, पण ऑगस्ट २०२६ पूर्वी लग्न होण्याची शक्यता धुसर आहे. पवित्रा पुनियाच्या आयुष्यातील चढ-उतार चाहत्यांसाठी नवीन नाहीत. या अमेरिकन बिझनेसमनशी ओळख होण्यापूर्वी पवित्रा अभिनेता एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

8/9
'बिग बॉस'च्या घरात सुरू झालेली ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचेल असं वाटत होतं, पण अचानक त्यांचं ब्रेकअप झालं. धर्माच्या मुद्द्यावरून त्यांच्यात दरी निर्माण झाल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या, मात्र दोघांनीही यावर कधीच उघडपणे भाष्य केलं नाही.

9/9
पवित्राने आपल्या पोस्टमध्ये आधीच इशारा दिला होता की, लग्नानंतर ती अमेरिकेत सेटल होणार आहे. पण आता या प्रसंगामुळे तिला काही महिने मुंबईतच थांबावं लागणार आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर तिला धीर देत आहेत.

मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement