advertisement

Mirzapur- The Film: आधी OTT गाजवलं, आता ‘मिर्झापूर: द फिल्म’ थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार, कधी होणार रिलीज?

Last Updated:

भारतातल्या बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द फिल्म’चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय क्राईम वेबसीरिजच्या फ्रँचायझींमधील एक हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी चाहते आतुर आहेत.

Mirzapur- The Film: आधी OTT गाजवलं, आता ‘मिर्झापूर: द फिल्म’ थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार, कधी होणार रिलीज?
Mirzapur- The Film: आधी OTT गाजवलं, आता ‘मिर्झापूर: द फिल्म’ थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार, कधी होणार रिलीज?
मुंबई: भारतातल्या बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द फिल्म’चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. वेबसीरीजचे तिनही सीझन सुपरहिट ठरल्यानंतर निर्मात्यांनी पुढचा सीझन न काढता थेट त्याचा आता चित्रपट काढण्याचाच निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय क्राईम वेबसीरिजच्या फ्रँचायझींमधील एक हा प्रोजेक्ट आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली ‘मिर्झापूर: द फिल्म’चे संपूर्ण शुटिंग झाले आहे. कल्ट-फेव्हरेट वेब सिरीजवर आधारित ही फिल्म 2026 मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण मिर्झापूरला आणखीन भव्य दिव्य स्वरूपात दाखवले जाणार आहे.
‘मिर्झापूर: द फिल्म’ ची शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती अली फजलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. शुटिंग दरम्यानचे वेगवेगळे भाग एडिट करून प्रोड्युसरने हा व्हि़डिओ एडिट केलेला आहे. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाची संपूर्ण शुटिंग अखेर संपली असून याची घोषणा निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. दमदार आणि थरारक थीम म्युझिकसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘It’s a wrap! #MirzapurTheFilm’ असे कॅप्शन देऊन व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट करत चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by ali fazal (@alifazal9)



advertisement
दमदार पात्रं आणि रॉ स्टोरीटेलिंगमुळे मिर्झापूरने गेल्या काही वर्षांत मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. आता ही कथा मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. ओरमॅक्स सिनेमॅटिक्सच्या सर्वाधिक प्रतिक्षित हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘मिर्झापूर: द फिल्म’ने आपलं स्थान मिळवलं आहे. विशेषतः आयकॉनिक पात्र मुन्ना भैय्या च्या पुनरागमनासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पुनीत कृष्णा निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित ‘मिर्झापूर: द फिल्म’ 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदु) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
स्थानिक राजकारण, खुर्चीसाठी सूड आणि रक्तरंजित राजकारण या सर्वांचा अनुभव प्रेक्षकांना आता चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. भव्य दिव्य रुपेरी पडद्यावर हा चित्रपट प्रेक्षकांना केव्हा पाहायला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. नुकतेच चित्रपटाची शुटिंग आटोपली असून यानंतर आता चित्रपटाच्या एडिटिंग कामाला सुरूवात होईल. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतरच्या आठ आठवड्यांनंतर भारतासह 240 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये प्राईम मेंबर्ससाठी ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mirzapur- The Film: आधी OTT गाजवलं, आता ‘मिर्झापूर: द फिल्म’ थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार, कधी होणार रिलीज?
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement