'आता, वडील रागावतील', या भीतीने 11 वर्षांच्या मुलीने संपवलं स्वतःला; पण 'त्या'दिवशी काय घडलं होतं?

Last Updated:

शुभ्राच्या आई-वडिलांचा वडापावचा स्टाॅल होता. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता. आई-वडील स्टाॅलवर गेले की, घरी भावंडांना सांभाळण्याची...

Satara News
Satara News
शिवथर (सातारा) : अकरा वर्षांचा शुभ्रा आपल्या भावंडांना घेऊन खेळत होती. खेळता-खेळता लहान भावाच्या डोळ्याला लागलं. 'आता वडील घरी आले की रागावणार', या भीतीने शुभ्राने भावंडांना बाहेरच्या खोलीत खेळण्यासाठी पाठवलं. तिने खुर्ची घेतली, त्यावर डबा ठेवला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना वडूथ (ता.सातारा) येथे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
...म्हणून बहिणीने स्वतःला संपवलं
समोर आलेली माहिती अशी की, शुभ्राच्या आई-वडिलांचा वडापावचा स्टाॅल होता. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता. आई-वडील स्टाॅलवर गेले की, घरी भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी अकरा वर्षांच्या शुभ्रावर असायची. त्या दिवशी (सोमवार, दि. 18 ऑगस्ट) आई-वडील स्टाॅलवर गेल्यानंतर शुभ्रा आपल्या भावंडांना घरी खेळवत होती. खेळत असताना लहान भावाच्या डोळ्याला चुकून लागलं. त्यामुळे ती घाबरली.
advertisement
वडील रागावतील याच भीतीने केली आत्महत्या
'आता, बाबा घरी आले की रागावतील', या भीतीने भावंडांना बाहेर खोलीत जायला सांगितलं. त्यानंतर शुभ्राने खुर्चीवर डबा ठेवला आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अकरा वर्षांच्या लहान मुलीने वडिलांच्या भीतीपोटी स्वतःला संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण राणे असे या मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे. राणे कुटुंब मूळचे रत्नागिरीतील आहे. पण ते काही वर्षांपासून वडूथ येथे राहत होते. त्यांचा सदर बाजार येथे वडापावचा स्टाॅल होता.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'आता, वडील रागावतील', या भीतीने 11 वर्षांच्या मुलीने संपवलं स्वतःला; पण 'त्या'दिवशी काय घडलं होतं?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement