तिरुवल्लूर: तमिळनाडूमध्ये एका मराठी तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चार आरोपींनी उस तोडायच्या धारदार कोयत्याने तरुणाच्या अंगवर अनेक वार केले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आरोपी अमानुष पद्धतीने मराठी तरुणावर वार करताना दिसत आहे.
तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अण्णामलई यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात चार तरुण मराठी तरुणावर कोयत्याने वार करताना दिसत आहेत. हल्ला होत असताना मराठी तरुण हात जोडून आरोपींकडे विनवणी करत होता. मात्र हल्लेखोर दमदाटी करून कोयत्याने सपासप वार करत राहिले. ७९ सेकंदाच्या व्हिडीओत आरोपींना ७० हून अधिक वार केले आहेत. या हल्ल्यात तरुणाचं रक्ताने माखल्याचं दिसत आहे.
advertisement
सूरज असं हल्ला झालेल्या ३४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो तमिळनाडूमध्ये मजूर म्हणून काम करत होता. शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी तिरुवल्लूर जिल्ह्यातील थिरुत्तनी रेल्वे क्वार्टर परिसरात त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा मूळचा महाराष्ट्रातील असून तो तामिळनाडूमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी चार अल्पवयीन मुले रील बनवत होती. यावेळी त्यांनी सूरजच्या गळ्याला ऊस तोडणीचा कोयता लावून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. सूरजने या कृत्याला विरोध केला, ज्याचा राग मनात धरून या मुलांनी त्याच्यावर त्याच कोयत्यामे सपासप वार केले.
अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
या अमानुष हल्ल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी हा व्हिडिओ एक्स अकाऊंटवर पोस्ट करून या घटनेचा निषेध केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुले सूरजच्या चेहरा, डोके, मान, पोट आणि हाता-पायावर निर्घृणपणे वार करताना दिसत आहेत. ही घटना घडत असताना हल्लेखोरांनी गांजाचं सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
