TRENDING:

APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?

Last Updated:

APMC Market: कृषी मार्केटमध्ये डाळिंब, केळी आणि आले बाजारात शुक्रवारी तेजी की मंदी राहिली याबाबत अपडेट जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्रातील विविध कृषी मार्केटमध्ये शेतमालाची आवक आणि विक्री होत असते. त्यानुसार कृषी मालाला बाजारभाव मिळत असतात. शुक्रवारी, 13 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या आले, केळी आणि डाळिंबाची आवक आणि त्याला मिळालेला भाव याबद्दल अपडेट लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊया.
advertisement

आल्याच्या आवकेत सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1517 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 508 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3600 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल आल्यास 6000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Agriculture: तब्बल 216 कोटींचा ‘केळी’ घोटाळा, उपग्रहानं केला भांडाफोड, कृषी क्षेत्रात खळबळ, काय घडलं?

advertisement

View More

केळीचे दर खाली

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 272 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी नाशिक बाजारात सर्वाधिक 100 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 94 क्विंटल केळीस सर्वाधिक 2750 रुपये बाजारभाव मिळाला.

डाळिंबाची आवक कमी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1239 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 857 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 10 क्विंटल डाळिंबास 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल