TRENDING:

भावासोबत अफेअरचा संशय, संभाजीनगरमध्ये तरुणीला 3 महिलांकडून बेदम मारहाण

Last Updated:

Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं तीन महिलांना एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं तीन महिलांना एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे. पीडित तरुणी एका उद्यानात बसली असताना तीन महिलांनी अचानक तिच्यावर हल्ला केला. आरोपी महिलांनी पीडितेला जमीनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगरच्या हडको येथील उद्यानात भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बेदम मारहाण केली. आसपास लहान मुले खेळत असताना अश्लील शिवीगाळ, आरडाओरड करून हा धिंगाणा सुरू होता. एन-11 मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली.

अंदाजे २५ वर्षांची तरुणी सोमवारी एन-11 च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसली होती. यावेळी तीन महिलांनी तिचा पाठलाग करत तिला उद्यानात गाठले. अचानक तिच्यावर हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तरुणी मारहाण न करण्यासाठी विनवणी करत होती. मात्र तीनही संतप्त महिलांनी तिला जमिनीवर पाडून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

संबंधित व्हिडीओत आरोपी महिला पीडितेला मारहाण करत असताना माझा मुलगा कामावर जात नाही. तुझ्या नादात बिघडला. तुझ्यासाठी तो आम्हाला त्रास देतो, अशी तक्रार करत मारहाण करत आहे. तिन्ही आरोपींनी पीडितेला केसाला धरून खाली पाडलं. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मराठी बातम्या/क्राइम/
भावासोबत अफेअरचा संशय, संभाजीनगरमध्ये तरुणीला 3 महिलांकडून बेदम मारहाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल