अलीकडेच, शाहिद कपूरने 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने उत्तर दिले की, "जेव्हा 'ॲनिमल' चित्रपटाची शुटिंग सुरू होती, त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा मला भेटले होते. त्यांना वाटत होतं की, 'ॲनिमल' चित्रपटामध्ये कबीर सिंगचा सुद्धा एक सीन असावा, पण तसं काही झालं नाही. 'ॲनिमल' चित्रपटामध्ये 'कबीर सिंग'चा एक छोटासा कॅमिओ असावा, असा त्यांच्या मनात विचार सुरू होता. त्यांनी दिलेल्या तारखा आणि माझ्या तारखांमध्ये ताळमेळ न बसल्यामुळे 'ॲनिमल' चित्रपटामध्ये 'कबीर सिंग' दिसला नाही. 'ॲनिमल'मध्ये एकत्र आलो नाही, पण पुढे भविष्यात कुठल्या तरी चित्रपटातून एकत्र येऊ."
advertisement
" 'कबीर सिंग' आणि 'ॲनिमल' हे दोन्हीही चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांचेच आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांच्या मनामध्ये कॅमिओ रोलची इच्छा होती. पण त्या तारखांमुळे काही झालं नाही. त्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही एका चित्रपटातून आम्ही एकत्र कसे येऊ, याचा निर्धार दिग्दर्शकांचा असेल. जे दिग्दर्शकांच्या मनात असेल, त्याप्रमाणे सर्व काही होईल." 2019 साली रिलीज झालेल्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'कबीर सिंग' चित्रपटामध्ये शाहिद कपूर सोबत कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम पाहायला मिळत आहे. तर, 2023 साली 'ॲनिमल' चित्रपट रिलीज होते, ज्यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कमालीची क्रेझ पाहायला मिळाली होती.
दरम्यान, 'कबीर सिंग' आणि 'ॲनिमल' या दोन्हीही चित्रपटांनी व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगली कामगिरी केली होती. दोन्ही चित्रपटांतील गाणीही प्रचंड हिट झाली होती. सध्या शाहिदचा "ओ रोमियो" प्रदर्शनाच्या तयारीत असून येत्या 13 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. रणबीर कपूरच्या "ॲनिमल पार्क"च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
