APMC Market: आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, केळी आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2395 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 726 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2750 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 610 क्विंटल आल्यास 6203 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 432 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी नाशिक बाजारात सर्वाधिक 310 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 100 क्विंटल केळीस सर्वाधिक 2750 रुपये बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 2001 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 1250 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल डाळिंबास सर्वाधिक 16000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:56 PM IST








