जन्माला येताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं, मृत्यूच्या दारातून परतलेला दशावतार फेम अभिनेता, प्रसंग ऐकून काळजाचा ठोका चुकेल!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dashavatar Fame Actor: नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचा जन्म झाला तेव्हा तो जिवंत नव्हता, तर डॉक्टरांनी त्याला चक्क मृत घोषित केलं होतं.
advertisement
advertisement
एका मुलाखतीत सिद्धार्थने आपल्या आयुष्यातील त्या सर्वात मोठ्या चमत्काराबद्दल सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, "माझा जन्म होत असताना अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या होत्या. माझ्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली गेली होती, ज्यामुळे श्वास घेणं कठीण झालं होतं. सुमारे दीड ते दोन मिनिटं माझ्या मेंदूला रक्तपुरवठा झाला नव्हता. हे एका नवजात बाळासाठी अत्यंत घातक असतं."
advertisement
सिद्धार्थ पुढे म्हणाला, "त्या क्षणी डॉक्टरांना वाटलं की सर्व संपलंय आणि त्यांनी मला मृत घोषित केलं. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. मी त्या मृत्यूच्या दारातून पुन्हा परत आलो. म्हणूनच आता आयुष्यात कितीही वाईट दिवस आले किंवा मी कितीही अपयशाच्या दरीत कोसळलो, तरी मी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेऊ शकतो, हा विश्वास मला त्या प्रसंगाने दिलाय."
advertisement
सिद्धार्थ मूळचा महाराष्ट्रीयन नाही, तरीही मराठी चित्रपटसृष्टीत तो एका यशस्वी अभिनेत्याच्या रूपात उभा आहे. या प्रवासाबद्दल बोलताना तो भावूक झाला. तो म्हणाला, "सुरुवातीला मला मराठी भाषा खूप कठीण वाटायची. पण इथल्या प्रेक्षकांनी, मीडियाने आणि निर्मात्यांनी मला जे प्रेम दिलं, ते शब्दांच्या पलीकडे आहे. अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी आणि सतीश राजवाडे यांसारख्या दिग्गजांनी मला कधीही परकं मानलं नाही. त्यांनी मला केवळ भाषाच नाही, तर जगण्याची कलाही शिकवली."
advertisement
१२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली आहे. गुरु ठाकूर यांचे संवाद आणि सिद्धार्थ मेननसोबत दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे आणि महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट एक 'मास्टरपीस' ठरला आहे. यातील सिद्धार्थच्या 'माधव मेस्त्री' या भूमिकेचं तर विशेष कौतुक होत आहे.









