शरद पवारांच्या पक्षाने घडवला चमत्कार पण सत्तेपासून एक पाऊल दूर, एका जागेमुळं महायुतीचं गणित जुळलं, उमेदवारांची यादी
- Reported by:ASIF MURSAL
- Published by:Sachin S
Last Updated:
माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
सांगली : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. 10 पंचायत समिती निवडणुकीचे मतमोजणी आज पार पडली आहे. यामध्ये ठाकरेंची शिवसेना वगळता सर्वच पक्षांची सत्ता पंचायत समितीवर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ११, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १, भाजप १६, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) 6 , शिवसेना शिंदे गट ८, इतर पक्ष 2 ठिकाणी विजय मिळवता आला आहे.
advertisement
.भाजपाला दोन पंचायत समिती काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट 2, शिवसेना शिंदे गट 2, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक पंचायत समितीवर सत्ता मिळवता आली आहे. तर शिराळा पंचायत समितीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांना आपल्या मतदारसंघातल्या पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात यश मिळाले आहे.
advertisement
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत लक्षवेधी लढतीत विजयी उमेदवारांची यादी
शिराळा - मांगले गटात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा मुलगा विराज नाईक (राष्ट्रवादी शरद पवार गट ) विजयी
शिराळा - वाकुर्डे बुद्रुक गटात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची सून राजेश्वरी रणधीर नाईक (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी
शिराळा - कोकरूड गटातून भाजप विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांची कन्या साई तेजस्विनी देशमुख ( जनस्वराज्य ) विजयी
advertisement
वाळवा तालुक्यात चिकुर्डे जिल्हा परिषद गटात उबाठा जिल्हाअध्यक्ष, अभिजित पाटील (शिवसेना ठाकरे गट) विजयी
वाळवा - वाटेगाव गटात माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या आनंदराव पाटील (राष्ट्रवादी श. प.) विजयी
वाळवा - येलूर गटात देविका भोजराज राजेघोरपडे (राष्ट्रवादी श. प.), विजयी
वाळवा - कामेरी गटात जयराज पाटील (भाजप) विजयी
वाळवा - कांता शिवाजी वाटेगावकर (राष्ट्रवादी श. प.), विजयी
advertisement
वाळवा - बागणी गटा मध्ये माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सून मोहिनी सागर खोत (रयत क्रांती पक्ष), विजयी
पलूस तालुक्यातील दुधोंडी गटात वर्षा जाधव (काँग्रेस) विजयी
पलूस तालुक्यात कुंडल गटात पतंगराव कदम यांचा नातू, आमदार विश्वजीत कदम यांचा भाचा ऋषिकेश लाड (काँग्रेस), विजयी
कडेगाव तालुक्यात माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू हिंगणगाव बुद्रुक गणात डॉ. जितेश हणमंतराव कदम (काँग्रेस) विजयी
advertisement
खानापूर तालुक्यात नागेवाडी गटात आमदार सुहास बाबर यांची भावजय शीतल अमोल बाबर (शिवसेना शिंदेगट) विरुद्ध सुजाता विजयी
खानापूर तालुक्यातील लेंगरे गटात पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल (शिवसेना शिंदेगट) विजयी
खानापूर बलवडी गणात माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे (शिवसेना शिंदे गट) विजयी
आटपाडी निंबवडे गटात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहिनी माधवी पडळकर (भाजप) विजयी
advertisement
आटपाडी - दिघंची गटात जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध कल्लाप्पा कुटे (भाजप), लढत
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव गटात विकास हाक्के (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) विजयी..
जत तालुक्यात जाडर बोबलाद गटात, जिल्हा परिषद माजी सभापती यांच्या पत्नी सावित्री तम्मानगौडा रवी-पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी
पंचायत समिती गण -कडेगाव - चिंचणी गणात आमदार विश्वजीत कदम यांचे पुतणे दिग्विजय शांताराम कदम (काँग्रेस) विजयी
सांगली जिल्हा परिषद सदस्य - वाळवा तालुका
१ प्रतिमा सुजित मोरे रेठरे हरणाक्ष - राष्ट्रवादी श.प
२ कांता शिवाजी वाटेगांवकर बोरगांव - राष्ट्रवादी श.प
३ संगिता संभाजी पाटील कासेगांव - राष्ट्रवादी श.प
४ संध्या आनंदराव पाटील वाटेगांव - राष्ट्रवादी श.प
५ मंदा भगवान माळी पेठ - राष्ट्रवादी श.प
६ देविका भोजराज घोरपडे येलूर - राष्ट्रवादी श.प
७ धैर्यशिल मानसिंग पाटील बावची - राष्ट्रवादी श.प
८ अभिजीत शिवाजीराव पाटील चिकुर्डे - उ.बा.ठा
९ संताजी रघुनाथ मेटकरी वाळवा - शिवसेना
१० जयराज चंद्रकांत पाटील कामेरी - भाजपा
११ मोहिनी सागर खोत बागणी - रयत आघाडी
वाळवा पंचायत समिती सदस्य विजयी उमेदवाराचे नाव मतदारसंघ (गण) - पक्ष
१ स्वाती संभाजी मदने कि.म.गड - राष्ट्रवादी श.प
२ पुजा नितीन मलगौंडी रेठरे हरणाक्ष - राष्ट्रवादी श.प
३ रुपाली शंकर सपाटे ताकारी - राष्ट्रवादी श.प
४ मनोज माणिकराव पाटील बोरगांव - राष्ट्रवादी श.प
५ सुप्रिया देवराज पाटील कासेगांव - राष्ट्रवादी श.प
६ प्रकाश गणपतराव पाटील वाटेगांव - राष्ट्रवादी श.प
७ रेश्मा श्रीकांत गुरव रेठरे धरण - राष्ट्रवादी श.प
८ वृशाली अतुल पाटील पेठ - राष्ट्रवादी श.प
९ प्रदिप तुकाराम पाटील साखराळे - राष्ट्रवादी श.प
१० शिवाजी आप्पा माळी ऐतवडे बु. - राष्ट्रवादी श.प
११ प्रकाश रघुनाथ पाटील ऐतवडे खुर्द - राष्ट्रवादी श.प
१२ प्रशांत प्रतापराव पाटील कारंदवाडी - राष्ट्रवादी श.प
१३ उदयसिंह प्रतापराव पाटील बागणी - राष्ट्रवादी श.प
१४ हर्षली धैर्यशील - मयुर पाटील बहादुरवाडी - राष्ट्रवादी श.प
१५ समर्थ सतिश पाटील नेर्ले - भाजपा
१६ शुभम तुकाराम पाटील कामेरी - भाजपा
१७ पुष्कराज पांडुरंग पाटील येलूर - भाजपा
१८ प्रदिप आकाराम कांबळे कुरळप - भाजपा
१९ प्राची राहुल अहिर वाळवा - शिवसेना
२० रुपाली श्रीकृष्ण पाटील पडवळवाडी - शिवसेना
२१ निता चंद्रकांत पाटील गोटखिंडी - शिवसेना
२२ शुभांगी प्रशांत पाटील बावची - शिवसेना
पलूस तालुक्यात काँग्रेस पक्षाने १२ पैकी ११ जागांवर विजय उमेदवार
कडेगाव तालुका
तडसर गट :
वैशाली संभाजी मुळीक : विजयी ( काँग्रेस ) : 14026
मंदाताई लालासौ करांडे : ( भाजपा ) : 10124
कडेपूर गट :
विद्या शिवाजी कुंभार : विजयी : ( काँग्रेस ) :12600
शकुंतला अधिकराव पिंगळे : ( भाजपा ) :10967
वांगी गट :
प्रियांका अमोल महाडिक : विजयी : ( काँग्रेस ) : 13142
स्नेहा सुशांत महाडिक : ( भाजपा ) : 12228
सुजाता महादेव होवाळ : ( आरपीआय ए) : 134
रुपाली लक्षण महाडिक : ( अपक्ष) :140
देवराष्ट्रे गट :
आशा प्रमोद गावडे : विजयी : (काँग्रेस ) : 16100
अंजना पांडुरंग होणमाने : (भाजपा ) :6794
कडेगाव पंचायत समिती गण उमेदवार
तडसर :
पैलवान रणजीत प्रतापराव पवार : विजयी : ( काँग्रेस ) :7340
विजय महादेव उर्फ मधुनाना भोसले : ( भाजपा ) :4745
सतीश यशवंत येताळ( मनसे ) : 56
आकाश सतीश वाघमारे ( अपक्ष ) :108
शाळगाव :
सुप्रिया सोमनाथ करांडे : विजयी : ( काँग्रेस ) :7287
प्रियांका वैभव पाटील ( भाजपा ) :4618
नेवरी :
डॉ विजय भीमराव महाडिक : विजयी : ( काँग्रेस ) :6742
लक्ष्मण जयसिंग कणसे : ( भाजपा ) :6095
सचिन नामदेव सावंत ( शिवसेना शिंदे गट ) :270
विजय परशुराम माळी ( अपक्ष ) : 32
पँथर सयाजीराव प्रल्हाद सकट ( अपक्ष ) :
वांगी :
राजकुवर दीपक सूर्यवशी : विजयी : ( काँग्रेस ) : 5953
मनिषा राजेंद्र पाटील : ( भाजपा ) :5669
सुनंदा विलास कदम ( शिवसेना शिंदे गट ) :457
निशिगंधा अजय शिंदे( मनसे ) :230
सुप्रिया विक्रम माळी ( अपक्ष) :101
हिंगणगाव बुद्रुक :
डॉ जितेश हणमंतराव कदम : विजयी : ( काँग्रेस ) : 8144
प्रा आशिष जयसिंग घार्गे ( भाजपा ) :5462
कडेपूर गण :
पूनम भुजंगराव माळी : विजयी : ( भाजपा ) :5765
सुवर्णा रमेश रूपणर ( काँग्रेस ) :4158
देवराष्ट्रे :
भारती अर्जुन मिसाळ : विजयी ( काँग्रेस ) :6586
रुपाली प्रल्हाद मिसाळ ( भाजपा ) :4500
पूनम राजेश गायगवाळे ( वंचित बहुजन आघाडी) :0294
चिंचणी :
दिग्विजय शांताराम कदम : विजयी : ( काँग्रेस ) :9198
कुलदीप सर्जेराव औताडे ( भाजपा ) :2365
जत तालुक्यातील जिल्हा परिषद विजयी उमेदवारांना मिळालेली मतं
सावित्री रवी (राष्ट्रवादी अजित पवार गट) : ११५४८
यलगोंडा तोरणे (भाजप) : ९९०६
कविता पाटील (भाजप): ८२३७
सरदार पाटील (भाजप) : ७६६६
रमेश देवर्षी (भाजप) : ११०६०
सुनील पवार (भाजप): ९५८२
डॉ शिवाजी खिलारे (भाजप): १२०७३
स्वप्नाली मासाळ (भाजप) : १२१५९
शिल्पा जीवनावर (भाजप) ९९८४
पंचायत समिती मतं
कल्पना अंकलगी (राष्ट्रवादी):६३५७
शालन ताई कोरे (राष्ट्रवादी): ४८३३
संगीता सावंत (काँग्रेस): ४९३९
उत्तमराव कट्टीमनी (भाजप): ४७६०
सदाशिव दर्गाकर (भाजप) : ३५२९
रवीकुमार बगली (भाजपा): ४६६८
लक्ष्मण चव्हाण (काँग्रेस): ३८६८
नकुसा शेंडगे (भाजपा): ४७५३
सुनिता बेडगे (भाजप): ५४६९
विना बिराजदार (भाजप): ५१३५
प्रमोद सावंत (काँग्रेस): ४४२४
विजय रुपनर (भाजप): ४४५८
सचिन बोराडे (भाजप): ४५८२
अर्चना पाटील (भाजप): ६८०८
महेश गावडे (भाजप): ५९१५
मनीषा दुधाळ (भाजप): ६२६७
बसवराज घेज्जी (काँग्रेस): ४८०२
मीनाक्षी अभंगे (भाजप): ४७४५
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांच्या पक्षाने घडवला चमत्कार पण सत्तेपासून एक पाऊल दूर, एका जागेमुळं महायुतीचं गणित जुळलं, उमेदवारांची यादी









