अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते गेल्या चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. अनुपम खेर यांनी 1984 साली महेश भट्ट दिग्दर्शित 'सारांश' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांना यशही मिळालं.
लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून झाली अभिनेत्री; पण घटस्फोटित अभिनेत्याशी लग्न करून गमावलं स्टारडम
advertisement
पदार्पण केल्यापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. गेल्या 40 वर्षात अनुपम खेर यांनी जवळपास 540 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुपम खेर यांनी सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ते अजूनही ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. भारतीय चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, भारत सरकारकडून त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
अनुपम खेर यांनी 1979 मध्ये अभिनेत्री मधुमालती कपूरसोबत लग्न केलं होतं, पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. नंतर 1985 मध्ये त्यांनी अभिनेत्री किरण खेरशी लग्नगाठ बांधली, त्या दोघे अजूनही सुखी संसार करत आहेत.
अनुपम खेर त्यांच्या चित्रपटांमधून चांगली कमाई करतात. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये फी घेतात. यासोबतच अनुपम खेर अनेक ब्रँडच्या जाहिराती करून भरपूर कमाई करतात. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, 2024 पर्यंत अनुपम खेर यांची एकूण संपत्ती 581 कोटी रुपये आहे. अनुपम खेर यांचे मुंबईत दोन बंगले आहेत. त्यांचा एक बंगला अंधेरी येथे आहे, तर दुसरे घर जुहू येथे आहे. या दोन्ही बंगल्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.
त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अनुपम खेर लवकरच 'कागज 2' आणि नंतर कंगना राणौतसोबत 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहेत. वयाच्या ६८ व्या वर्षीही हा अभिनेता पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.