TRENDING:

BBM5 : 'तुम्हाला नक्की बाहेर काढेल...' जान्हवीवर संतापला रितेश देशमुख; काय ठरलं कारण?

Last Updated:

रितेश देशमुख सीझनच्या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या आठवड्यात रितेशचं स्पर्धकांनी खूप कौतुक केलं होतं. आता दुसऱ्या आठ्वड्यात रितेश कोणाची शाळा घेणार तर कोणाची पाठ थोपटणार जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य पार पडलं. या नॉमिनेशननंतर घरातील सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले आहे. खेळ पुढे नेण्यासाठी प्रत्येकाला एक नवी संधी मिळाली आहे. घरात काही स्पर्धकांमध्ये मैत्री तर काहींमध्ये भांडण पाहायला मिळालं आहे. अशातच आता आज घरात पुन्हा एकदा भाऊचा धक्का रंगणार आहे. रितेश देशमुख सीझनच्या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या आठवड्यात रितेशचं स्पर्धकांनी खूप कौतुक केलं होतं. आता दुसऱ्या आठ्वड्यात रितेश कोणाची शाळा घेणार तर कोणाची पाठ थोपटणार जाणून घ्या.
बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी
advertisement

'बिग बॉस मराठी'चा यंदाचा दुसरा भाऊचा धक्का खूप विशेष असणार आहे. पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची शाळा घेतली होती. तर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर तो जान्हवीची बोलती बंद करताना दिसणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व असतं. बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे. यावरु भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीला चांगलंच सुनावणार आहे.

advertisement

वेश्याव्यवसायात झाली अटक; रेस्क्यू होममध्ये घालवले दिवस; आता असं आयुष्य जगतेय ही अभिनेत्री

'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारतो. रितेश भाऊ म्हणतो,"बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही...पण तुम्हाला नक्की काढेल".

advertisement

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा 'लय भारी' खेळ सुरू झाला आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकीनऊ आणणं सुरू झालंय. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. पण तरी या सगळ्यात कोण आहे राईट आणि कोण आहे वाईट हे भाऊच्या धक्क्यावर कळेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. प्रेक्षकांनी या सीझनला सुपरहिट केलंय. या आठवड्याच्या खेळाचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबास 13250 रुपये भाव, आले आणि द्राक्षाची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये 16 अतरंगी सदस्या दाखल झाले आहेत. ज्यात वर्षा उसगांवकर , वैभव चव्हाण, अरबाज पटेल, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे,आर्या जाधव, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेदार, अंकिता प्रभू वालावलकर, निखिल दामले, धनंजय पोवार, पुरुषोत्तदादा पाटील, सूरज चव्हाण अशी सगळ्या सदस्यांची नावं आहेत. 16 पैकी पहिल्या आठवड्यात सर्वात कमी मत मिळाल्यानं पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर गेले. आता दुसऱ्या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाची घरातुन एक्झिट होणार ते पाहणं महत्वाचं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM5 : 'तुम्हाला नक्की बाहेर काढेल...' जान्हवीवर संतापला रितेश देशमुख; काय ठरलं कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल