TRENDING:

APMC Market : डाळिंबास 13250 रुपये भाव, आले आणि द्राक्षाची काय स्थिती? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. बुधवार, दिनांक 25 फेब्रुवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. बुधवार, दिनांक 25 फेब्रुवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात.
advertisement

आल्याच्या दरात सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1994 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 722 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3750 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 102 क्विंटल आल्यास 5600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Agriculture News : शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, Video

advertisement

द्राक्षाची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 1601 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1888 क्विंटल द्राक्षास 150 ते 600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 691 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

डाळिंब दराची लाली वाढली  

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1591 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 684 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल डाळिंबास 13250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : डाळिंबास 13250 रुपये भाव, आले आणि द्राक्षाची काय स्थिती? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल