advertisement

Agriculture Success: मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, खडकाळ माळावर पिकवल ‘सोनं’, 30 गुंठ्यात कमाई लाखात

Last Updated:
Agriculture Success: मराठवाड्यातील शेतकऱ्यानं खडकाळ माळरानावर सोनं पिकवलंय. 30 गुंठ्यात लाखात कमाई होत आहे.
1/5
शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे एखादी प्रयोगशाळाच असते. त्यामुळे काही शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असतात. जालना जिल्ह्यातील कंडारी येथील एका युवा शेतकऱ्याने असाच एक यशस्वी प्रयोग केला आहे. स्वप्नील राठोड हे अंजिर शेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहेत.

2/5
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावाजवळील लक्ष्मीनगर तांड्यात राहणारे स्वप्नील राठोड पारंपरिक शेती करायचे. परंतु, नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव अन् विविध संकटे यामुळे ते अंजिर शेतीकडे वळले.

3/5
खुलताबाद येथून जम्बो जातीचे 200 अंजीर रोपे त्यांनी 2021 मध्ये मागवली. या रोपांची 14 बाय 15 अंतरावर लागवड केली. अवघ्या 18 महिन्यात त्यांना उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला कमी उत्पादन मिळायचे. परंतु, आता झाडे मोठी झाली असून उत्पादनात देखील वाढ झाली आहे.

4/5
स्वप्नील यांनी 30 गुंठे खडकाळ माळावर शेतात अंजिर लागवड केली. यातून त्यांना 3 टन उत्पादन मिळते. बाजारात 100 रुपये किलो असा दर मिळत असून 3 लाख रुपये उत्पन्न होत आहे.

5/5
या पिकाला फारसा खर्च करावा लागत नाही. घरी असलेल्या जनावरांचे शेणखत, पाणी आणि काही प्रमाणात फवारणी केली की हे पीक चांगले येते. शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले तर चांगली कमाई होऊ शकते, असं स्वप्नील राठोड सांगतात.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement