Bad Combination : काय सांगता! भात आणि चपाती एकाचवेळी खाऊ नये? तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Eating rice and chapati together : बाहेर जेवायला गेल्यानंतरही तंदूर रोट्यानंतर लोक जिरा राईस मागवतात. मात्र पोषणतज्ञांचे यावर वेगळेच मत आहे. तज्ज्ञांच्या मते चपाती आणि आणि भात एकाचवेळी खाऊ नये.
मुंबई : आपल्याकडे दिवसातले एक तरी जेवण थाळी भरून असते. म्हणजे भाजी, चपाती, वरण, भात त्यासोबत लोणचं किंवा दही. वर्षानुवर्षे आपल्याला असे जेवण करण्याची सवय आहे. बाहेर जेवायला गेल्यानंतरही तंदूर रोट्यानंतर लोक जिरा राईस मागवतात. मात्र पोषणतज्ञांचे यावर वेगळेच मत आहे. तज्ज्ञांच्या मते चपाती आणि आणि भात एकाचवेळी खाऊ नये.
होय, तुम्ही बरोबर वाचलंत. चपाती आणि भात एकाचवेळी खान आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. इंस्टाग्रामवर dieticianashugupta या अकाऊंटवर डाएटिशियन आशु गुप्ता यांनी माहिती दिली आहे. चला पाहूया त्यांचे असे मत का आहे आणि चपाती-भात एकाचवेळी खाल्ल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात.
भात आणि चपाती का खाऊ नये एकत्र..
- तज्ज्ञांच्या मते, भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचन बिघडू शकते. एकाचवेळी हे दोन्ही जर आपण खाल्ले तर पचन व्यवस्थित होत नाहीत आणि पोषक तत्वांचे शोषणही योग्य प्रकारे होत नाही.
advertisement
- आहारतज्ञ आशु गुप्ता यांच्या मते, भात आणि चापटी एकत्र खाल्ल्याने कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि कालांतराने वजन वाढू शकते.
- तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, जेव्हा आपण एकाच वेळी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खातो. तेव्हा आपल्या शरीराला ते पचवण्यास खूप मेहनत लागू शकते आणि त्रास होऊ शकतो. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतात आणि नंतर ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते.
advertisement
- भात आणि चपातीचे हे मिश्रण पचनसंस्थेवर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वांचे विघटन आणि प्रभावीपणे शोषण करणे कठीण होते.
पचन सुधारण्यासाठी काय खावं?
आशु यांच्यामते, तुम्हाला तुमचे पचन आणि एकूण आरोग्य सुधारायचे असेल तर तुम्ही भात किंवा चपातीऐवजी स्टार्च नसलेल्या भाज्या, लिन प्रोटिन्स आणि हेल्दी फॅट्स खावे. हा संतुलित आहार रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास, पोषक तत्वांचे शोषण वाढविण्यास मदत करतो. तसेच यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते.
advertisement
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 3:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bad Combination : काय सांगता! भात आणि चपाती एकाचवेळी खाऊ नये? तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण








