Nashik-Akkalkot Highway: नाशिक- अक्कलकोट ग्रीन कॉरिडोर महामार्ग केव्हापर्यंत पूर्ण होणार? कसा असेल आराखडा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिक- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली आहे. आता या ग्रीनफिल्ड कॉरिडोरच्या कामाला गती मिळालेली आहे. या महामार्गामुळे प्रवास अधिकच जलद होणार असून पुढच्या दोन वर्षामध्ये संपूर्ण काम होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मार्ग पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस ठेवला आहे.
नाशिक- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मान्यता मिळाली आहे. आता या ग्रीनफिल्ड कॉरिडोरच्या कामाला गती मिळालेली आहे. या महामार्गामुळे प्रवास अधिकच जलद होणार असून पुढच्या दोन वर्षामध्ये संपूर्ण काम होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मार्ग पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस ठेवला आहे.
advertisement
काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून जमीन संपादन करण्याच्या कामाला पुन्हा एकदा गती देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाचा अखेर शुभारंभ झाला आहे. या प्रकल्पाच्या कामकाजाला आता चालना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.नाशिक- अक्कलकोट महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील 107.33 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
advertisement
नाशिक जिल्ह्यातल्या जमिनी संपादित करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांकडून आणि शेतकऱ्यांकडून हरकती आणि सूचना मागवायला सुरूवात केली आहे. हे काम त्यांना 21 दिवसांमध्येच पूर्ण करायचे आहे. या दिवसांमध्ये प्रशासनाला मिळालेल्या आक्षेपांची नोंद करून सक्षम अधिकाऱ्यांकडून ठराविक वेळेत त्यावर निर्णय दिला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
374 किलोमीटरचा संपूर्ण मार्ग 70 मीटर रुंदीचा 152 किलोमीटरचा आणि 60 मीटर रुंदीचा 222 किलोमीटरचा मार्ग असेल. दऱ्याखोऱ्यांमधून सुमारे 5.6 किलोमीटरचा विशेष भाग तयार केला जाणार आहे. तसेच 27 मोठे पूल आणि 164 लहान पूल आणि जोडरस्त्यांचा समावेश असेल. महामार्ग तयार झाल्यानंतर उत्तर- दक्षिण मार्ग तयार होऊन प्रवास अधिकच सुखकर आणि जलद होईल.
advertisement
त्यानंतर या कामाला प्रशासनाकडून सुरूवात होणार आहे. महामार्गाची सुरूवात नाशिकपासून होत असून तो चेन्नईपर्यंत जोडतो, या महामार्गाची एकूण लांबी 374 किमीपर्यंत असणार आहे. यामुळे महाराष्ट्र ते दक्षिण भारत एकाच रस्त्याच्या माध्यमातून जोडता येणार आहे. या मार्गावर एकूण 27 मोठे पूल असून, 164 लहान पूल उभारले जाणार आहेत. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी, उद्योजक, पर्यटकांसह नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.









