advertisement

Rashmika-Vijay Wedding: लग्नाच्या आधीच विजयच्या आईकडून रश्मिकाला मिळाली अनमोल भेट, एकाच मांडवात दोनदा करणार लग्न!

Last Updated:
Rashmika-Vijay Wedding Updates: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा शाही विवाहसोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
1/8
ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट पाहत होता, तो शाही विवाहसोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना उद्या, २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरच्या एका आलिशान राजवाड्यात साता जन्माच्या गाठी बांधणार आहेत.

2/8
लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून, या विरोश जोडीने आपल्या लग्नात परंपरा आणि आधुनिकतेचा असा काही मेळ घातला आहे की, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

3/8
साधारणपणे लग्नाआधी संगीत किंवा डान्सचे कार्यक्रम असतात, पण विजय आणि रश्मिकाच्या लग्नात काहीतरी हटके पाहायला मिळालं. दोन्ही कुटुंबांमध्ये चक्क एक 'प्री-वेडिंग क्रिकेट मॅच' खेळवण्यात आली.

4/8
विजय आणि रश्मिकाच्या घरच्यांनी मैदानात उतरून जो उत्साह दाखवला, त्याने लग्नाचा आनंद द्विगुणित केला. या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

5/8
उद्या उदयपूरमध्ये हा विवाहसोहळा दोन वेगवेगळ्या पद्धतींनी पार पडणार आहे. सकाळी विजयच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार, पारंपरिक तेलुगू हिंदू पद्धतीनुसार लग्नाचे विधी पार पडतील. संध्याकाळी रश्मिकाच्या मूळ 'कूर्ग' (कर्नाटक) परंपरेनुसार कोडावा विधी पार पडेल.

6/8
या शाही लग्नासाठी पुजाऱ्यांची एक खास टीम आज २५ फेब्रुवारी रोजीच उदयपूरमध्ये दाखल झाली आहे. हे लग्न अत्यंत खाजगी ठेवण्यात आलं असून, फिल्मी दुनियेतील कोणत्याही मोठ्या स्टारला इथे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

7/8
रश्मिकाचं स्वागत देवरकोंडा कुटुंबात मोठ्या उत्साहात होतंय. विजयची आई माधवी देवरकोंडा यांनी रश्मिकाला त्यांच्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पुरातन बांगड्या भेट म्हणून दिल्या आहेत. हे केवळ दागिने नसून कुटुंबाचा वारसा आणि प्रेम रश्मिकाला सुपूर्द केल्याचं प्रतीक मानलं जात आहे.

8/8
लग्नात जरी चित्रपटसृष्टीतील कलाकार दिसणार नसले, तरी त्यांच्यासाठी ४ मार्च रोजी हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. या पार्टीला दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलीवूडपर्यंतचे सर्व दिग्गज हजेरी लावणार आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement