Success Story : ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ शो पाहिला, वयाच्या साठीत बनल्या शेफ, बिझनेसमधून कमाईच कमाई
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
येथे इटालियन डेझर्ट पन्ना कोटाचे तब्बल 20 प्रकार चाखायला मिळतात. सायली मांजरेकर यांची या कॅफेमागे प्रेरणादायी कथा आहे.
पुणे : खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात नवनवीन पदार्थांची रेलचेल नेहमीच पाहायला मिळते. पारंपरिक चवींबरोबरच आता आंतरराष्ट्रीय पदार्थांनाही पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशाच एका वेगळ्या संकल्पनेतून उभा राहिलेला व्यवसाय म्हणजे जेएम रोड परिसरातील वॉबल्स कॅफे. येथे इटालियन डेझर्ट पन्ना कोटाचे तब्बल 20 प्रकार चाखायला मिळतात. सायली मांजरेकर यांची या कॅफेमागे प्रेरणादायी कथा आहे.
वयाच्या साठीमध्ये व्यवसायाची सुरुवात करण्याचे धाडस सायली यांनी दाखवले. 2019 साली त्यांनी ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ हा लोकप्रिय शो पाहिला. या कार्यक्रमातूनच त्यांना पन्ना कोटा या इटालियन डेझर्टची ओळख झाली. हा पदार्थ पाहताच त्यांनी तो घरी करून पाहण्याचा निर्णय घेतला. चार ते पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अपेक्षित चव आणि टेक्स्चर साध्य झाले. घरच्यांनीही त्यांच्या या प्रयोगाला पूर्ण पाठिंबा दिला.
advertisement
सुरुवातीला त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये पन्ना कोटाचा छोटासा स्टॉल लावला. रहिवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर औंधमधील एका गार्डनमध्ये स्टॉल लावून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. ग्राहकांची वाढती मागणी पाहता आणि कोरोना काळानंतर परिस्थिती सुधारताच त्यांनी जेएम रोड परिसरात वॉबल्स कॅफे सुरू केले.
advertisement
सायली सांगतात, व्यवसाय सुरू करावा ही माझ्या नवऱ्याची खूप दिवसांची इच्छा होती. मात्र कोणता व्यवसाय करायचा हे ठरत नव्हते. मास्टरशेफ पाहिल्यानंतर पन्ना कोटा करण्याची कल्पना सुचली आणि त्यातूनच हा प्रवास सुरू झाला. त्यांच्या या निर्णयामागे पतीची इच्छा पूर्ण करण्याची भावना होती, तसेच स्वतःच्या आवडीचे काहीतरी करण्याचा आत्मविश्वासही होता.
advertisement
वॉबल्स कॅफेमध्ये सध्या पन्ना कोटाचे 20 वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. स्ट्रॉबेरी, मॅंगो, कॅरेमल, रसमलाई, चॉकलेट यांसारख्या विविध चवी ग्राहकांना आकर्षित करतात. विशेष म्हणजे, या डेझर्टची किंमत 99 रुपयांपासून सुरू होते. विद्यार्थ्यांपासून ते कुटुंबीयांपर्यंत सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवण्याचा सायली यांचा प्रयत्न आहे. या व्यवसायामधून त्या महिन्याला हजारो रुपये कमाई करतात.
advertisement
सायली मांजरेकर यांचा ऑस्ट्रेलियन मास्टरशेफमधून मिळालेल्या प्रेरणेने सुरू झालेला हा गोड प्रवास आज पुणेकरांच्या पसंतीस उतरला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 3:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ शो पाहिला, वयाच्या साठीत बनल्या शेफ, बिझनेसमधून कमाईच कमाई








