60 वर्षांचा व्यक्ती अन् 28 वर्षांच्या तरुणीनं केलं लग्न, अपहरणाची बातमी आणि मग बाळाला दिला जन्म, नक्की प्रकरण काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
समाजाच्या आणि घरच्यांच्या भीतीने या जोडप्याने सीमा ओलांडून नेपाळ गाठले आणि तिथे विवाह केला. मात्र, या प्रेमवेड्या जोडीच्या आयुष्यात खरी खळबळ तेव्हा माजली, जेव्हा शाइस्ताच्या भावाने पोलिसांत धाव घेतली.
मुंबई : "प्रेमाला वयाचं बंधन नसतं," असं आपण अनेकदा ऐकतो. जेव्हा दोन मनं एकमेकांत गुंततात, तेव्हा समाज, काळ, वेळ आणि वय या सगळ्या गोष्टी महत्वाच्या रहात नाही. कोणी म्हणतात प्रेम एकदाच होतं, तर कोणी म्हणतात की प्रेमाला दुसरी संधी नक्कीच मिळते. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडलेली एक घटना सध्या याच गोष्टीची प्रचिती देत आहे, जिथे एका 60 वर्षीय शाळेच्या संचालकाने आपल्यापेक्षा 32 वर्षांनी लहान असलेल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडला आणि लग्न देखील केलं.
ही गोष्ट आहे मुजफ्फरपूर जिल्ह्यातील औराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. मकसूदपूर येथे राहणारे 60 वर्षीय राकेश कुमार शाह हे एक खाजगी शाळा चालवतात. याच शाळेत 28 वर्षीय शाइस्ता परवीन शिक्षिका म्हणून कार्यरत होती. एकत्र काम करता करता कधी त्यांच्यात सूत जुळलं, हे कोणालाच कळलं नाही. 60 वर्षांच्या संचालकाला 28 वर्षांच्या तरुणीशी पुन्हा एकदा प्रेम झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
advertisement
समाजाच्या आणि घरच्यांच्या भीतीने या जोडप्याने सीमा ओलांडून नेपाळ गाठले आणि तिथे विवाह केला. मात्र, या प्रेमवेड्या जोडीच्या आयुष्यात खरी खळबळ तेव्हा माजली, जेव्हा शाइस्ताच्या भावाने पोलिसांत धाव घेतली.
18 फेब्रुवारी रोजी शाइस्ताचा भाऊ फैसल इमाम अशरफ याने औराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, त्याची बहीण शाळेत शिकवायला गेली होती पण परतलीच नाही. त्याने शाळा संचालक राकेश कुमार शाह यांच्यावर बहिणीच्या अपहरणाचा आरोप केला.
advertisement
मात्र, दुसरीकडे शाइस्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सर्वांना चकित केले. तिने स्पष्टपणे सांगितले की, "माझे कोणीही अपहरण केलेले नाही. मी स्वमर्जीने राकेश कुमार यांच्याशी 2025 मध्येच प्रेमविवाह केला आहे." हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात चर्चेला उधाण आले.
या संपूर्ण प्रकरणाने तेव्हा नाट्यमय वळण घेतले, जेव्हा 18 तारखेला भावाने अपहरणाची केस दाखल केली आणि दुसऱ्याच दिवशी, 19 फेब्रुवारीला शाइस्ताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलमधील शाइस्ता आणि तिच्या नवजात बाळाचे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाइस्ताला सीतामढी येथील एका हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले. सध्या ती पोलीस देखरेखीखाली उपचार घेत आहे.
advertisement
एका बाजूला भावाने बहिणीच्या अपहरणाची तक्रार दिली आणि दुसऱ्याच दिवशी बहीण आई झाली, हा केवळ योगायोग असू शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की शाइस्ताच्या भावाला ती गरोदर असल्याची माहिती आधीपासूनच होती का? समाजात आपली अब्रू वाचवण्यासाठी किंवा बहिणीला 'सेफ' करण्यासाठी त्याने अपहरणाचा बनाव रचला होता का?
सध्या हे प्रकरण संपूर्ण बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. प्रेमासाठी वयाची सीमा ओलांडणारे हे जोडपे सध्या कायदेशीर कचाट्यात सापडले असले, तरी त्यांच्या या धाडसी प्रेमाची गोष्ट मात्र घराघरांत पोहोचली आहे. शाळा संचालक अजूनही पोलिसांच्या अटकेबाहेर असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 5:03 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
60 वर्षांचा व्यक्ती अन् 28 वर्षांच्या तरुणीनं केलं लग्न, अपहरणाची बातमी आणि मग बाळाला दिला जन्म, नक्की प्रकरण काय?









