advertisement

Pune Food : स्वस्तात मस्त! 30 रुपयांत जेवा पोटभर, पुण्यात इथं आहे ठिकाण

Last Updated:
श्री भोजनालयने अनेकांसाठी दिलासा दिला आहे. लक्ष्मी इंगळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात अवघ्या 30 रुपयांत पोटभर थाळी उपलब्ध करून दिली जाते.
1/7
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. मात्र, वाढती महागाई, हॉस्टेल आणि मेसचे खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात सकस जेवण मिळणे कठीण होते.

2/7
अशा परिस्थितीत सदाशिव पेठेतील श्री भोजनालयने अनेकांसाठी दिलासा दिला आहे. लक्ष्मी इंगळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात अवघ्या 30 रुपयांत पोटभर थाळी उपलब्ध करून दिली जाते.

3/7
लक्ष्मी इंगळे स्वतः काही काळ हॉस्टेलमध्ये राहून मेसमध्ये जेवण करत होत्या. खूप पैसे देऊनही समाधानकारक आणि घरगुती जेवण मिळत नव्हते. मी सात महिने मेसमध्ये कामही केले. तेव्हा वाटले, कमी पैशांत चांगले जेवण देता येऊ शकते. मग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे त्या सांगतात.

4/7
एक वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्री भोजनालयमध्ये 30, 50 आणि 60 रुपयांच्या थाळ्या उपलब्ध आहेत. 30 रुपयांच्या थाळीत दोन चपात्या, वरण-भात आणि एक भाजी दिली जाते. तर 50 रुपयांच्या थाळीत पालेभाज्या, फळभाज्या, पिठलं, भरीत, वरण-भात अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. रोज वेगवेगळे मेनू ठेवले जात असल्याने जेवण घरच्यासारखे आणि ताजे असते.

5/7
या भोजनालयात दररोज साधारण 150 ते 300 प्लेट्स जेवण विकले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी हे प्रमुख ग्राहक असले तरी रिक्षाचालक, कामगार वर्ग आणि आसपासचे नागरिकही येथे आवर्जून येतात. बाहेर एका वेळच्या जेवणाच्या पैशांत येथे दोन वेळा पोटभर जेवण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आर्थिक दिलासा मिळतो, असे इंगळे सांगतात.

6/7
लक्ष्मी इंगळे सर्व स्वयंपाक स्वतः करतात, तर चपात्या बनवण्यासाठी परिसरातील एका महिलेकडून मदत घेतात. त्यामुळे इतरांनाही रोजगाराची संधी मिळत आहे. कमी दरात, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे श्री भोजनालय विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरत आहे.

7/7
महागाईच्या काळात 30 रुपयांत पोटभर आणि घरगुती चव देणारा हा उपक्रम केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. पुण्यातील या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement