२०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो शेतकरीचे पैसे मिळणार का? कृषिमंत्र्यांनी थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळत असतो. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी पत्र ठरू शकतात त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही.
मुंबई : पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळत असतो. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी पत्र ठरू शकतात त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही.असा प्रश्न पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं आहे.
नेमक्या अडचणी काय?
आमदार आवताडे म्हणाले की, शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो. मात्र,सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना हा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत. तसेच या योजनेसाठी १ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेला ५ वर्षांचा काळ उलटून गेला आहे. परंतु निकषांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. २०१९ नंतर सातबारा उताऱ्यावर नाव चढलेले नवीन शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच वडिलांच्या निधानांनतर ज्या शेतकऱ्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवलेले आहे त्यांना हा लाभ मिळतो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली ते लाभापासून वंचित राहत आहेत.
advertisement
कृषीमंत्री काय म्हणाले?
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नाला उत्तर देतांना मोठं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले की, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना शेतकाऱ्यांसाठी राबवली जाते. आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ३९ हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. दुसरीकडे निकषांनुसार २०१९ नंतर जमीन खरेदी केलेले शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी ठरत नाही. याबाबत आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करू.निकषांमध्ये बदल करण्यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे. योजनेच्या निकषांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.असं मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
२०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो शेतकरीचे पैसे मिळणार का? कृषिमंत्र्यांनी थेट सांगितलं









