Budh Vakri 2026: हाताला यश, पैशांची चिंता मिटणार; होळीच्या आधीच 3 राशींना खुशखबर, वक्री बुधाची किमया
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो. एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो. आता 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी बुध मीन राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर तो उलट चालीने प्रवास करत 20 मार्च रोजी रात्री 01 वाजून 02 मिनिटांनी पुन्हा मार्गी होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचा थेट परिणाम आपल्या व्यवसायावर आणि बुद्धीचा वापर करून कराव्या लागणाऱ्या कामांवर होतो. आपल्या शरीराचा विचार केला तर बुध प्रामुख्याने गळा आणि खांद्यावर प्रभाव पाडतो. या वक्री काळात बुध काही राशींना सुवर्णसंधी देणार आहे, तर काही राशींना सावध राहावे लागेल. या काळात बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे 4 राशींना सर्वात शुभ परिणाम मिळणार आहेत, त्यांच्या विषयी जाणून घेऊ.
advertisement
वृषभ - बुध तुमच्या लाभ स्थानी वक्री होत आहे, जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला अचानक धनलाभाच्या संधी मिळतील आणि उत्पन्नामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. आयुष्यात सर्व प्रकारच्या सुख सोयींची प्राप्ती होईल. चांगले फळ टिकवून ठेवण्यासाठी 20 मार्चपर्यंत गळ्यात तांब्याचं नाणं किंवा तांब्याचा तुकडा परिधान करा.
advertisement
सिंह - बुधाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करेल. तुम्ही तुमची सर्व कामं उत्साहाने पूर्ण कराल आणि नवीन विषयांवर सखोल विचार करू शकाल. तुम्ही केलेल्या कष्टाचं योग्य फळ तुम्हाला लवकरच मिळेल अशी चिन्हे आहेत. शुभ परिणाम मिळवण्यासाठी बुधवारी मातीच्या भांड्यात थोडा मध भरून ते घरापासून दूर निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका.
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ शत्रूंपासून सुटका करून देणारा असेल. तुम्हाला तुमच्या मित्रांची उत्तम साथ लाभेल. प्रिंटिंग, प्रेस, कागद आणि लेखणीशी संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तुम्ही जे काही काम कराल ते मनापासून आणि उत्साहाने कराल. उपाय म्हणून कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी लहान मुलींचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास त्यांना एखादी भेटवस्तू द्या.
advertisement
वृश्चिक - बुधाच्या प्रभावामुळे तुमचे मन अभ्यासात आणि नवीन गोष्टी शिकण्यात चांगले रमेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात विशेष लाभ मिळतील आणि गुरुंचे योग्य मार्गदर्शन लाभेल. जे लोक नात्यात आहेत, त्यांच्या लव्हलाईफमध्ये गोडवा येईल. बुद्धी आणि विवेकाच्या जोरावर तुम्ही तुमची कामं मार्गी लावाल. उपाय म्हणून बुधाचे शुभ फळ मिळवण्यासाठी 20 मार्चपर्यंत जमेल तितकी गोमातेची सेवा करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






