राखीने बिग बॉसच्या घरात इच्छाधारी नागिण म्हणून आली होती. त्यामुळे बिग बॉस राखीची एक इच्छा पूर्ण करणार आहे. राखीने या एपिसोडमध्ये घरातल्या अपात्र सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला. म्हणून बिग बॉसने राखीवर विष- अमृत हा टास्क देण्याचं ठरवलं. विष म्हणजे स्विमिंग पूल. यामध्ये जो सदस्य पडेल तो सदस्य एलिमिनेट होईल. जो सदस्य स्विमिंग पूलमध्ये जाणार नाही, तो सेफ राहिल. तो स्पर्धक कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत राहिल. यासाठी पहिल्या क्रमांकावर प्राजक्ता आणि अनुश्री. प्राजक्ता स्विमिंग पूलमध्ये गेली तर अनुश्री कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली.
advertisement
दुसऱ्या क्रमांकावर दिपाली आणि करण होते. दिपाली स्विमिंग पूलामध्ये गेली तर करण कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेला. तिसऱ्या क्रमांकावर राकेश आणि सागर होता. यामध्ये दोघंही नॉमिनेट झालेले होते. चौथ्या क्रमांकावर तन्वी आणि रुचिता आहे. यामध्ये, रुचिता स्विमिंग पूलामध्ये गेली तर तन्वी कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली. त्यानंतर सचिन आणि प्रभू आला होता. यामध्ये, सचिन स्विमिंग पूलामध्ये गेला तर प्रभू कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली. सर्वात शेवटी आयुष आणि रोशन आला होता. तर राखीने यामध्ये आयुष स्विमिंग पूलामध्ये गेला तर रोशन कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेला आहे. पाचव्या आठवड्यामध्ये प्राजक्ता, दिपाली, राकेश, सागर, सचिन आणि आयुष हे स्पर्धक नॉमिनेशच्या शर्यतीत गेले आहेत. यामधून कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत जातो आणि कुठला स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
