TRENDING:

'इमोशन्सचा बाजार मांडलाय', तन्वीचा पत्ता कट! तोंडाशी आलेला कॅप्टन्सीचा घास काढून घेतला, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Tanvi Kolte Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने विशालच्या हातात अशी एक ताकद दिली, ज्याने एका सदस्याचं कॅप्टन होण्याचं स्वप्न क्षणात धुळीला मिळालं आणि घरात एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' चा खेळ आता अशा वळणावर आलाय जिथे कोणाची मैत्री खरी आणि कोणाचा राग बेगडी, हे ओळखणं कठीण झालंय. घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री झाल्यामुळे आधीच सदस्यांचे धाबे दणाणले असताना, आता विशाल कोट्टियनला मिळालेल्या एका विशेष अधिकारामुळे घराचं संपूर्ण समीकरणच बदललं आहे. बिग बॉसने विशालच्या हातात अशी एक ताकद दिली, ज्याने एका सदस्याचं कॅप्टन होण्याचं स्वप्न क्षणात धुळीला मिळालं आणि घरात एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
News18
News18
advertisement

विशालचा पॉवर गेम अन् तन्वीचा पत्ता कट

कॅप्टन्सीच्या शर्यतीत प्रभू, तन्वी, करण, रोशन आणि अनुश्री हे पाच शिलेदार 'पॉवर की' घेऊन उभे होते. मात्र, बिग बॉसने विशालला आदेश दिला की, यातील एकाची ताकद तो हिरावून घेऊ शकतो. विशालने थेट तन्वीवर निशाणा साधला आणि तिची 'पॉवर की' काढून घेतली. विशालने यामागे जे कारण दिलं, ते ऐकून घरातील सदस्यही थक्क झाले. विशाल म्हणाला, "मी तन्वीची चावी काढून घेतोय कारण तिला कॅप्टन्सीची प्रचंड भूक आहे. तिला मदत करण्यासाठी मी नेहमीच हात पुढे केला, पण गरज संपली की तिने माझाच हात झटकला. मला वाटतं की ती इथे सगळ्यांचा वापर करतेय. लोकांचे इमोशन वापरून खेळणं मला अजिबात आवडत नाही. अशी कॅप्टन्सी मिळवून काही फायदा नाही. म्हणून मी तिची पावर की काढून घेतोय."

advertisement

'ती गप्प आहे म्हणून मी वाचलो', जिच्यासोबत जोडलं नाव, गोविंदाने गायचे तिचेच गुणगाण; सुनीता आहुजाच्या आरोपांवर म्हणाला...

तन्वीचा पलटवार विशालला पलटवार

विशालचे हे गंभीर आरोप ऐकताच तन्वीचा पारा चढला. तिने सर्वांसमोर विशालला सडेतोड उत्तर देत त्याची शाळा घेतली. तन्वी गरजली, "तुम्हाला अधिकार कोणी दिला की मी लोकांना वापरते? मी इमानदारीने नाती निभावते, त्यातून दुखावली जाते पण पुन्हा उभी राहते. तुम्ही माझ्यासमोर बोलायला घाबरता आणि पाठीमागून वार करता. तुमच्यासारखी गोड बोलणारी माणसं माणुसकीसाठी घातक आहेत!"

advertisement

तन्वीने पुढे ठणकावून सांगितलं की, तिने आजवर कोणाशीही डील करून गेम खेळलेला नाही. "इथे प्रत्येकजण स्वतःचा खेळ खेळायला आलाय, प्रत्येकजण कोपऱ्यात जाऊन एकमेकांची घाण काढतो. मग मलाच का टार्गेट केलं जातंय?" असा सवालही तिने उपस्थित केला.

राखीची एन्ट्री आणि बदललेली समीकरणं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

एकीकडे विशाल आणि तन्वीमध्ये ही जुंपलेली असताना, दुसरीकडे राखी सावंतने घराचा ताबा घेतला आहे. राखीने आल्या आल्या सगळ्यांची शाळा घ्यायला सुरुवात केली असून, तिच्या अतरंगी वागण्यामुळे स्पर्धकांच्या नाकी नऊ आले आहेत. आता विशालने तन्वीची चावी घेतल्यावर प्रभू, करण, रोशन, विशाल आणि अनुश्री यांच्यात कॅप्टन्सीची चुरस उरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'इमोशन्सचा बाजार मांडलाय', तन्वीचा पत्ता कट! तोंडाशी आलेला कॅप्टन्सीचा घास काढून घेतला, नेमकं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल