TRENDING:

विशालच्या हातात बिग बॉसची ताकद! Power Key घेणार काढून; कोणाचा गेम पालटणार, VIDEO

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंत वाईल्ड कार्डने आली असून विशाल कोट्टियनला बिग बॉसने स्पेशल पावर दिली आहे. काय आहे ती स्पेशल पावर?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील रंगत आणखी वाढू लागली आहे. घरात ड्रामा क्विन राखी सावंतची एन्ट्री झाली आहे. राखी घरात वाईल्ड कार्ड म्हणून आली. राखीच्या येण्याने घरातील सगळ्या सदस्यांच्या नाकी नऊ आले आहेत. राखीनं आल्याआल्याच घरातील सगळ्यांची शाळा घेतली. कॅप्टन्सीसाठी उभ्या राहिलेल्या सगळ्या सदस्यांना राखी पुरून उरली. एकीकडे राखी तर दुसरीकडे विशाल कोट्टियन स्पर्धकांच्या डोईजड होणार आहे. कारण विशालला बिग बॉसची ताकद मिळाली आहे.
News18
News18
advertisement

'बिग बॉस मराठी'च्या घरात आता खेळाला नवं वळण आलं आहे. घरात प्रत्येक आठवड्याबरोबर खेळ अधिकच रोचक होत चालला आहे. आता या खेळात येणार आहे एक अशी संधी, जी संपूर्ण समीकरणं बदलू शकते. विशालला संपूर्ण आठवड्याचा गेम पालटवायची संधी मिळाली आहे. विशाल घरातील एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो.

( Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने राखीला दिले विशेष अधिकार, कोणते ६ स्पर्धक झाले नॉमिनेट; वाचा यादी )

advertisement

समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस विशालला स्पेशल ताकद देऊन पावर की असलेल्या स्पर्धकांपैकी एकाची की काढून घेण्याच्या सूचना देतात. सध्या कॅप्टनीसाठी उभ्या राहिलेले उमेदवार, प्रभू, तन्वी, करण, रोशन आणि अनुश्री यांच्याकडे पावर की आहे. विशाल आता यांच्यापैकी कोणाची पावर की काढून घेणार? हे पाहणं आजच्या एपिसोडमध्ये इंट्रेस्टिंग ठरणार आहे.

घरातील समीकरणं, मैत्री, मतभेद आणि रणनीती या सगळ्यांवर या एका निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. विशालचा हा निर्णय कोणाला अडचणीत टाकणार? आणि कोणासाठी ठरणार धोक्याची घंटा? या गेम-चेंजिंग ट्विस्टमुळे घरात नवा वाद, नवी चर्चा आणि नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फूड बिझनेस सुरू करताय? मुंबईत अवघ्या 30 रुपयांत डझन प्लेट, स्वस्तात मार्केट कुठं
सर्व पहा

सोशल मीडियावरील कमेंट्स पाहता अनेकांनी यात तन्वीचं नाव घेतलं आहे. आता विशाल खरंच तन्वीची पावर की काढून घेणार का? की टोळीतील सदस्याचाच घात करणार हे पाहणं मजेशीर असेल. विशाल आणि तन्वीचं भांडणं आहे. मी तन्वीला कधीच कॅप्टन होऊ देणार असं विशालने अनेकदा सांगितलं आहे. आता नेमकं काय घडणार हे आजच्या भागात पाहायला मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
विशालच्या हातात बिग बॉसची ताकद! Power Key घेणार काढून; कोणाचा गेम पालटणार, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल