advertisement

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने राखीला दिले विशेष अधिकार, कोणते ६ स्पर्धक झाले नॉमिनेट; वाचा यादी

Last Updated:

राखीने येताच सर्व स्पर्धकांची शाळा घेतली आहे. बिग बॉसने राखीला कॅप्टन्सी टास्कसाठीची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. जे स्पर्धक राखीच्या मते कॅप्टन पदासाठी लायक आहे, त्यांना तिला निवडायचं आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने राखीला दिले विशेष अधिकार, कोणते ६ स्पर्धक झाले नॉमिनेट; वाचा यादी
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने राखीला दिले विशेष अधिकार, कोणते ६ स्पर्धक झाले नॉमिनेट; वाचा यादी
बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये आता खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंटचा तडका लागणार आहे. घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. राखी घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून गेली आहे. तिने घरात एन्ट्री घेताच घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. घरात जाताच तिनं तन्वी कोलतेची शाळा घेतली. पहिल्याच दिवशी राखीचा ड्रामा सुरू झाला आहे. राखीने येताच सर्व स्पर्धकांची शाळा घेतली आहे. बिग बॉसने राखीला कॅप्टन्सी टास्कसाठीची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. जे स्पर्धक राखीच्या मते कॅप्टन पदासाठी लायक आहे, त्यांना तिला निवडायचं आहे.
advertisement
राखीने बिग बॉसच्या घरात इच्छाधारी नागिण म्हणून आली होती. त्यामुळे बिग बॉस राखीची एक इच्छा पूर्ण करणार आहे. राखीने या एपिसोडमध्ये घरातल्या अपात्र सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला. म्हणून बिग बॉसने राखीवर विष- अमृत हा टास्क देण्याचं ठरवलं. विष म्हणजे स्विमिंग पूल. यामध्ये जो सदस्य पडेल तो सदस्य एलिमिनेट होईल. जो सदस्य स्विमिंग पूलमध्ये जाणार नाही, तो सेफ राहिल. तो स्पर्धक कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत राहिल. यासाठी पहिल्या क्रमांकावर प्राजक्ता आणि अनुश्री. प्राजक्ता स्विमिंग पूलमध्ये गेली तर अनुश्री कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली.
advertisement
दुसऱ्या क्रमांकावर दिपाली आणि करण होते. दिपाली स्विमिंग पूलामध्ये गेली तर करण कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेला. तिसऱ्या क्रमांकावर राकेश आणि सागर होता. यामध्ये दोघंही नॉमिनेट झालेले होते. चौथ्या क्रमांकावर तन्वी आणि रुचिता आहे. यामध्ये, रुचिता स्विमिंग पूलामध्ये गेली तर तन्वी कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली. त्यानंतर सचिन आणि प्रभू आला होता. यामध्ये, सचिन स्विमिंग पूलामध्ये गेला तर प्रभू कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेली. सर्वात शेवटी आयुष आणि रोशन आला होता. तर राखीने यामध्ये आयुष स्विमिंग पूलामध्ये गेला तर रोशन कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत गेला आहे. पाचव्या आठवड्यामध्ये  प्राजक्ता, दिपाली, राकेश, सागर, सचिन आणि  आयुष हे स्पर्धक नॉमिनेशच्या शर्यतीत गेले आहेत. यामधून कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत जातो आणि कुठला स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने राखीला दिले विशेष अधिकार, कोणते ६ स्पर्धक झाले नॉमिनेट; वाचा यादी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement