TRENDING:

Dhurandhar 2: “‘शोले’नंतर इतकं यश कोणत्याही चित्रपटाला मिळालं नाही…”, ‘धुरंधर’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया; ‘धुरंधर २’बद्दल म्हणाल्या…

Last Updated:

Dhurandhar Success: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळतोय. चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतका दमदार प्रतिसाद मिळूनही निर्मात्यांना चित्रपटाची कमाई फार कमी वाटतेय. निर्माती ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाच्या सक्सेसबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळतोय. 2025 मध्ये, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाने आपले स्थान कमावले आहे. हजार कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही 'धुरंदर'चा क्रमांक पाहायला मिळाला. हजार कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये टॉप 10 मध्ये 'धुरंदर' चा क्रमांक आहे. दोन महिन्यानंतर चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे, तरीही अजूनही प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतका दमदार प्रतिसाद मिळूनही निर्मात्यांना चित्रपटाची कमाई फार कमी वाटत आहे. निर्माती ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाच्या सक्सेसबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला.
Dhurandhar 2: “‘शोले’नंतर इतकं यश कोणत्याही चित्रपटाला मिळालं नाही…”, ‘धुरंधर’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया; ‘धुरंधर २’बद्दल म्हणाल्या…
Dhurandhar 2: “‘शोले’नंतर इतकं यश कोणत्याही चित्रपटाला मिळालं नाही…”, ‘धुरंधर’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया; ‘धुरंधर २’बद्दल म्हणाल्या…
advertisement

‘फॉर्च्युन इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ‘धुरंधर’च्या निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी ‘धुरंधर’ च्या यशाची तुलना ‘शोले’ च्या यशाशी केली. त्यांनी सांगितले की ‘शोले’ नंतर मला एकही फिल्म सक्सेस झाल्याचे लक्षात येत नाही. “हे फक्त चित्रपटाच्या मेकर्सचं यश नाहीये, तर प्रेक्षकांचेही यश आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद कित्येक दशकांनंतर मिळाला आहे. प्रेक्षकांनी अनेकदा हा चित्रपट पाहिला आहे आणि आता 60 दिवसांहून अधिक दिवस हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. ‘शोले’ चित्रपटानंतर मला इतर कोणत्याही चित्रपटाबद्दल इतकं मोठं यश पाहायला मिळालं नाही. याहून चांगला सन्मान निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना मिळूच शकणार नाही. इतके पैसे मार्केटिंगच्या माध्यमातूनही मिळणार नाहीत.”

advertisement

सिक्वेलबद्दल निर्मात्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की, पहिल्या भागापेक्षाही दुसरा भाग मोठा असणार आहे. पुढे ज्योती देशपांडे म्हणाल्या की, " जर पहिला भाग यशस्वी झाला नसता तर कदाचित सिक्वेल फाईल्समध्येच राहिला असता, परंतु टीमला विश्वास आहे की, हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल. आता, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी पुढे असाही दावा केला की, हिंदीमध्ये बनवला गेला असला तरी, दक्षिण भारतात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाय, ‘धुरंधर’ चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

‘धुरंधर’ हा एक स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसह अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन सारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. जिओ स्टुडिओज आणि बी 62 स्टुडिओज बॅनरखाली ‘धुरंधर’ चित्रपटाने वर्ल्डवाइड 1300 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यापेक्षाही अधिक कमाई चित्रपटाने केली. 19 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपट रिलीज होणार आहे. त्यादिवशी यशचा ‘टॉक्सिक: ए फेअरिटेल फॉर ग्रोन- अप्स’ चित्रपट रिलीज होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट क्लॅशेस होण्याची शक्यता आहे. सहाजिकच चित्रपटांच्या कमाईवरही फरक पडण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar 2: “‘शोले’नंतर इतकं यश कोणत्याही चित्रपटाला मिळालं नाही…”, ‘धुरंधर’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया; ‘धुरंधर २’बद्दल म्हणाल्या…
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल