Mumbai Food : गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गोड म्हणून ओळखले जाणारे कलिंगड येथे तिखट आणि चटकदार मसाल्यांसोबत दिले जाते.
मुंबई : शहरातील फूड लव्हर्ससाठी वेगवेगळ्या देशांच्या खाद्यसंस्कृती अनुभवण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मेक्सिकन फूडची क्रेझही सध्या चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. हीच संधी ओळखत निशिल शाह आणि अक्षय पटेल या दोन तरुणांनी रेंच कॅफेची सुरुवात केली असून येथे मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा वेगळा अनुभव मिळतो.
या कॅफेमधील एक खास आकर्षण म्हणजे स्पाइसी वॉटरमेलन. सामान्यतः गोड म्हणून ओळखले जाणारे कलिंगड येथे तिखट आणि चटकदार मसाल्यांसोबत दिले जाते. कलिंगडच्या कापावर टोबिराना आणि चामोय सॉसचा लेयर लावून त्यावर मेक्सिकन मसाल्यांची भुरभुर केली जाते. गोड, आंबट आणि तिखट अशा तिन्ही चवींचा समतोल या पदार्थात अनुभवता येतो.
मेक्सिकन फूडमधील आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे टाको. रेंच कॅफेमध्ये सेव्हन लेयर टाको, स्मोक टाको, पेस्टो टाको, ट्रीप्पी टाको तसेच पेरी पेरी पोटॅटो टाको असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक टाको वेगवेगळ्या सॉस आणि फिलिंग्समुळे खास चव देणारा ठरतो.
advertisement
यासोबतच व्हेज रॅप आणि व्हेज राईस बाऊलमध्येही अनेक पर्याय ठेवण्यात आले आहेत. भाज्या, सॉस आणि मसाल्यांचे योग्य प्रमाण यामुळे हे पदार्थ चवदार आणि पोटभरीचे ठरतात. त्यामुळे वेज फूड आवडणाऱ्यांसाठीही येथे चांगले पर्याय मिळतात.
माटुंगा परिसर सहसा साउथ इंडियन पदार्थांसाठी ओळखला जातो. मात्र याच परिसरात रेंच कॅफेमध्ये वेगळ्या चवीचे मेक्सिकन पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे मिळणारे बहुतांश पदार्थ 90 रुपयांपासून सुरू होत असल्याने हे पदार्थ सर्वसामान्यांसाठीही परवडणाऱ्या दरात मिळतात. त्यामुळे माटुंग्यात साउथ इंडियनसोबतच आता मेक्सिकन चवींचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सकाळी 11.30 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कॅफेमध्ये मेक्सिकन पदार्थांची विविधता आणि वेगळ्या चवींचा अनुभव घेता येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Mumbai Food : गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video









