The 50: 'नवऱ्यापासून वेगळी राहते', लग्नाच्या 2 वर्षातच पतीला घटस्फोट देणार दिव्या अग्रवाल? भव्याने काढले अभिनेत्रीच्या अब्रुचे ढिंढवडे
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Divya Agrawal : 'बिग बॉस १९' नंतर काही दिवसांतच 'द ५०' हा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच या शोमध्ये रिॲलिटी शो स्टार दिव्या अग्रवालबद्दल जे विधान करण्यात आलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे.
advertisement
advertisement
ग्लॅमर वर्ल्डमध्ये नाती जितक्या वेगाने बनतात, तितक्याच वेगाने ती चर्चेच्या फेऱ्यात अडकतात. सध्या असाच काहीसा प्रकार 'The 50' या रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळतोय. 'बिग बॉस ओटीटी' विजेती दिव्या अग्रवाल आणि तिचे पती अपूर्व पाडगांवकर यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दिव्या अग्रवालच्या लग्नाबद्दल वावड्या उठण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ मध्येही दिव्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचे काही फोटो हटवल्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्यावेळी दिव्याने सडेतोड उत्तर देत म्हटलं होतं की, "मी माझ्या प्रोफाईलवरून २५०० पोस्ट डिलीट केल्या, पण मीडियाला फक्त माझ्या लग्नाचे फोटो दिसले. माझं वैयक्तिक आयुष्य उत्तम सुरू आहे आणि घटस्फोट किंवा बाळ यापैकी सध्या काहीही घडत नाहीये."
advertisement
गंमत म्हणजे, याच शोमध्ये दिव्या अनेकदा आपल्या पतीची, अपूर्वाची आठवण काढून भावूक होताना दिसली आहे. अपूर्वने तिला या इंडस्ट्रीत नवीन मैत्री करण्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं, हे सांगताना तिचे डोळे अनेकदा पाणावले. एकीकडे भव्याचे आरोप आणि दुसरीकडे दिव्याचं हे हळवं रूप, यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.







