advertisement

जिल्हा परिषद निवडणुकीत VBA वंचित आघाडीचा धक्का, MIM चाही सुपडा साफ, कुणी किती जागा जिंकल्या?

Last Updated:

वंचित आघाडीचे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आघाडीने उमेदवार उभे केले होते. 

News18
News18
धाराशिव: राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. निकालाचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी गटाने बाजी मारली असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे प्रस्थापितांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीला महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही अपेक्षित यश आलं नाही. नगर परिषदा निवडणुकीत वंचित आघाडीने १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. पण, जिल्हा परिषदेत मात्र, काही ठिकाणीच विजय मिळाला आहे.
धाराशिव जिल्ह्यात वंचित आघाडीने पहिला विजय मिळवला आहे.  जिल्ह्यातील ईट सर्कल पखरुड पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका प्रवीण रणबागुल यांचा 1133 मतांनी विजयी झाल्या आहेत. पंचायत समिती निवडणुकीतला वंचित आघाडीचा हा पहिला विजय आहे. विशेष म्हणजे, वंचित आघाडीचे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आघाडीने उमेदवार उभे केले होते.
advertisement
छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये वंचित आघाडीने काँटे की टक्कर दिली होती. अगदी काही मतांनी वंचित आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत वंचित आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर वंचित आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली. पण, भोपळाही फोडता आला नाही. अशीच अवस्थाही असाऊद्दीन ओवेसी याांच्या एमआयएम पक्षाची झाली आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, पालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने ३३ जागा जिंकून दोन नंबरचा पक्ष ठरला होता. पण, जिल्हा परिषद निवडणुकीत भोपळाही फोडता आलं नाही.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद - 63 / 61 जागा
भाजप : 23
शिवसेना : 19
शिवसेना UBT: 8
NCP : 2
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 0
अपक्ष : 7
तर दुसरीकडे लातूर महापालिका निवडणुकीमध्ये वंचित आघाडीने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली आणि सत्ताही स्थापन केली आहे. लातूरमध्ये वंचितचे ४ उमेदवार विजयी झाले होते. तर काँग्रेसने ४३ जागा जिंकल्या होत्या. पण, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहे. तर वंचित आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. उलट इथं मनसेचा एकमेव उमेदवार विजय झाला आहे.
advertisement
लातूर जिल्हा परिषद विजयी : 59/57
भाजप : 18
काँग्रेस : 22
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 11
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद निवडणुकीत VBA वंचित आघाडीचा धक्का, MIM चाही सुपडा साफ, कुणी किती जागा जिंकल्या?
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement