Raqesh Bapat : आधी डिवोर्स, मग ब्रेकअप; राकेश बापटला करायचं आहे दुसरं लग्न! सांगितली कशी हवीये मुलगी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Raqesh Bapat : अभिनेता राकेश बापटला पुन्हा लग्न करायचं आहे. त्याला कशी बायको हवी आहे हे देखील त्यानं सांगितलं. राकेश नेमकं काय म्हणाला? पाहूयात.
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमधील गप्पा, वाद आणि इमोशनल क्षण नेहमीच दिसत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एका भागात अभिनेता राकेश बापटने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. नाश्त्याच्या टेबलावर झालेल्या निवांत गप्पांमध्ये त्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला कशी जोडीदार हवी आहे हे देखील सांगितलं.
advertisement
advertisement
डिवोर्सनंतर राकेशच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची आणि अभिनेत्री शमिता शेट्टीची जवळीक वाढली. शिल्पा शेट्टीची बहिण असलेल्या शमिताबरोबर त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. शोदरम्यान दोघांचं नातं खुललं आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
advertisement
आधी लग्न, डिवोर्स आणि ब्रेकअपनंतर राकेश बापटला पुन्हा लग्न करायचं असल्याचं त्यानं सांगितलं. बिग बॉस मराठी 6 त्या घरात राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि दिपाली सय्यद हे तिघे नाश्ता करत बसले होते. गप्पांच्या ओघात विषय लग्नावर आला. त्यावेळी राकेशनं थोड्या मिश्किल अंदाजात त्याच्या मनातील भावना सांगितल्या.
advertisement
advertisement
advertisement








