DIY Detan Face Pack : पिवळी नाही चेहऱ्यावर लावा भाजलेली हळद! 'या' DIY फेस पॅकने टॅनिंग पहिल्याच वापरात होईल कमी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Homemade detan face pack : आज आम्ही तुम्हाला टॅनिंगवर एक सोपा उपाय सांगणार आहोत. हळद चेहऱ्यावर लावणं सामान्य आहे. पण तुम्ही कधी भाजलेली हळद चेहऱ्यावर लावलीय का? चला पाहूया याचे फायदे.
मुंबई : हिवाळ्यात बऱ्याचदा लोक आवर्जून सूर्यप्रकाशात बसतात. किंवा बरेच लोक फिरायलाही आणि मग काय, शरीर चांगलंच टॅन होतं. मग हे टॅनिंग काढता काढता नाकी नऊ येतात. पण आज आम्ही तुम्हाला यावर एक सोपा उपाय सांगणार आहोत. हळद चेहऱ्यावर लावणं सामान्य आहे. पण तुम्ही कधी भाजलेली हळद चेहऱ्यावर लावलीय का? चला पाहूया याचे फायदे.
तुम्ही महागड्या पार्लर उपचारांचा अवलंब न करता तुमच्या त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल, तर भाजलेल्या हळदीचा हा उपाय बेस्ट आहे. ती नियमित फेस पॅकपेक्षा खूपच प्रभावीपणे काम करते आणि तुमच्या त्वचेला फायदा देते. हळद भाजल्याने त्याचे औषधी गुणधर्म वाढतात आणि ती पिवळसर रंग येण्यापासून रोखते.
हा पॅक नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करतो, ज्यामुळे त्वचा आतून चमकदार आणि निर्दोष राहते. सोशल मीडियावर ३ जणांच्या एक ग्रुपने स्वतःच्या चेहऱ्यांवर हा प्रयोग केला आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकॉउंटद्वारे याची माहिती दिली आहे. चला पाहूया त्यांनी नेमका काय उपाय सांगितला आहे.
advertisement
असा बनवा फेसपॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला हळद, कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि मध लागेल. सर्वप्रथम हळद एका तव्यावर पूर्णपणे भाजून घ्या. याने ती थोडी काळी पडेल. नंतर ती तव्यावरून काढू एका वाटीत घ्या. त्यात थोडासा लिंबाचा रस आणि कॉफी पावडर घाला. आता या मिश्रणात मध घाला. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा फेस पॅक वापरू शकता. हा फेसपॅक नियमित लावल्याने हळूहळू टॅनिंग कमी होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
advertisement
advertisement
हा फेसपॅक वापरल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक परत येईलच पण त्वचेच्या इतर अनेक समस्याही दूर होण्यास मदत होईल. मात्र तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. तुम्हाला तीव्र टॅनिंग असेल तर नियमित वापरामुळे तुमची त्वचा कोणतेही नुकसान न होता उजळू शकते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 3:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
DIY Detan Face Pack : पिवळी नाही चेहऱ्यावर लावा भाजलेली हळद! 'या' DIY फेस पॅकने टॅनिंग पहिल्याच वापरात होईल कमी!










