advertisement

मासे पकडायला नदीत उतरले, मगरीनं सावज हेरलं, सांगलीत अडीच तास जीवघेणा थरार

Last Updated:

Sangli News: कठड्यावर उभा राहून मासे पकडत असतानाच त्यांचा काठावर येण्याचा मार्ग मगरीने अडवला.

मासे पकडायला नदीत उतरले, मगरीनं सावज हेरलं, सांगलीत अडीच तास जीवघेणा थरार
मासे पकडायला नदीत उतरले, मगरीनं सावज हेरलं, सांगलीत अडीच तास जीवघेणा थरार
सांगली: कृष्णा नदीकाठावर मगरींचा वावर असून हल्ला आणि जीवघेणा अनुभव अनेकांना येत असतो. आता दोघा मासे पकडणाऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. मासे उतरण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोघे मगरीच्या कचाट्यात सापडले. तब्बल अडीच तासांचा जीवघेणा थरार झाला. शेवटी मच्छीमारांच्या लोखंडी काईलीतून त्यांना वाचवण्यात आले.
नेमकं घडलं काय?
कृष्णा नदीकाठावर बायपास पुलाखाली कठड्यावरून मासे पकडले जातात. तौफिक अल्लाउद्दीन कुरणे (वय 35) आणि संजय संभाजी लोंढे (वय 38) हे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी गळ टाकून मासे पकडतात. शनिवारी दुपारच्या सुमारास दोघेजण मासे पकडण्यासाठी बायपास पुलाखाली आले. गुडघाभर पाण्यात उतरून पुलाच्या पहिल्या कॉलमच्या कठड्यावर गेले. त्या ठिकाणी उभा राहून त्यांनी मासे पकडण्यास सुरुवात केली.
advertisement
कठड्यावर उभा राहून मासे पकडत असतानाच त्यांचा काठावर येण्याचा मार्ग मगरीने अडवला. दोघेजण बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना मगर डोके वर काढून हल्ल्याच्या तयारीत पुढे आली. त्यामुळे ते घाबरले आणि आरडाओरडा सुरू केला. परंतु, दुपारची वेळ असल्याने जवळपास कुणी नव्हतं. त्यांचा आरडाओरडा सुरू असतानाच मगर पाण्यात बुडाली.
advertisement
मगर पुन्हा पाण्यात गेल्यावर दोघांनी पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तर लगेच मगरीने डोके वर काढले. त्यामुळे पुन्हा ते कठड्यावर गेले. दोन ते अडीच तास हा थरार सुरू होता. आरडाओरडा ऐकून काहींनी हा प्रकार मोबाईल कॅमेरात टिपला. तसेच मदतीसाठी रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. पण तत्काळ बोट मिळाली नाही. तेव्हा रेस्क्यू टीमचे कैलास वडर यांनी मच्छीमारांच्या काईलीतून त्यांना बाहेर काढले.
advertisement
दरम्यान, रेस्क्यू टीममुळे हा अडीच तासांचा जीवघेणा थरार संपला आणि दोघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही वर्षात या ठिकाणी ते मासे पकडत होते. परंतु, असा अनुभव पहिल्यांदाच आल्याचे त्यांनी सांगितले. आता या पुलाखाली मासे पकडण्यास पुन्हा फिरकणार नाही, असंही ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मासे पकडायला नदीत उतरले, मगरीनं सावज हेरलं, सांगलीत अडीच तास जीवघेणा थरार
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement