advertisement

फार्महाऊसवर नेलं, आईसह मुलीला विवस्त्र व्हायला लावलं, खरातनंतर नवी मुंबईत भोंदूबाबाचा विकृती कांड

Last Updated:

अशोक खरातचं हे प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईत देखील असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका भोंदूबाबाने मायलेकीवर विकृतीचा कळस गाठला आहे.

Ai Generated Photo (left side)
Ai Generated Photo (left side)
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. त्याने अनेक महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीचे अनेक व्हिडीओज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी आरोपी खरातला पोलिसांनी अटक देखील केली आहे. अशोक खरातचं हे प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईत देखील असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका भोंदूबाबाने मायलेकीवर विकृतीचा कळस गाठला आहे. त्याने दोघींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आरोपी भोंदूबाबाचं नाव आहे. त्याने काळीजादू, भानामती दूर करण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याने फार्महाऊसवर घेऊन जात अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी दोन महिलांनी आरोपी अब्दुल रशीद विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
advertisement

अब्दुल रशीद महिलांना जाळ्यात कसं ओढायचा?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. तो अल्लाहचे महत्त्व पटवून देत, श्रद्धाळू लोकांचा विश्वास संपादन करायचा. कधी गोड बोलून त्यांना वश करायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपलंस करायचा. आर्थिक , सामाजिक , शारीरिक, वैवाहिक समस्या दूर करतो, असं सांगून तो लोकांना जाळ्यात अडकवायचा. त्याने आपल्या जाळ्यात अडकवून खालापूरयेथे विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे.
advertisement
याशिवाय त्याने मुंबईच्या सांताक्रूझ येथील एका विवाहितेसह तिच्या मुलीवर देखील अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर त्याने दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीनं पीडित मायलेकीला तुमच्यावर काळी जादू झाली आहे, अशी भीती दाखवली होती. काळीजादू काढण्यासाठी एक पूजा घालावी लागेल, असंही आरोपीनं सांगितलं होतं.
हीच पूजा घालण्यासाठी आरोपी भोंदूबाबाने पीडित महिलेसह तिच्या मुलीला खालापूर येथील निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊस बोलावलं होतं. इथं गेलं असता आरोपीनं मध्यरात्री काळीजादू दूर करण्याच्या बहाण्याने दोघींना अंगावरील वस्त्रे काढून पूजा करण्यास भाग पाडलं. यानंतर आरोपीनं जादूटोणा आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार केला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र सध्या तो मोकाट आहे. मागील अनेक वर्षांपासून आरोपी खालापूर, नवी मुंबई, कळंबोली या भागात अॅक्टीव्ह आहे. या काळात त्याने अनेक महिलांना अशाप्रकारे जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
फार्महाऊसवर नेलं, आईसह मुलीला विवस्त्र व्हायला लावलं, खरातनंतर नवी मुंबईत भोंदूबाबाचा विकृती कांड
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement