advertisement

घरात ‘ती’ एकटीच, चुलता-पुतण्यानं संधी साधली, अडवायला आलेल्या स्वत:च्याच भावालाच संपवलं, छ. संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: एका नातेवाईक महिलेवर लहान भाऊ संजय मोहिते आणि पुतण्या अनिल मनोहर मोहिते यांची वाईट नजर होती.

तिला घरात एकटं पाहिलं, ‘त्यांनी’ संधी साधली, पण..., लहान भावानंच मोठ्याला संपवलं, छ. संभाजीनगरात खळबळ
तिला घरात एकटं पाहिलं, ‘त्यांनी’ संधी साधली, पण..., लहान भावानंच मोठ्याला संपवलं, छ. संभाजीनगरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर: नात्याला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरले. महिलेवर जबरदस्ती करताना अडवायला आलेल्या सख्ख्या भावालाच संपवले. सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. प्रकाश आसाराम मोहिते (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपी संजय आसाराम मोहिते (वय 40) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकनगर येथील प्रकाश मोहिते यांच्या नातेवाईक महिलेवर त्यांचा लहान भाऊ संजय मोहिते आणि पुतण्या अनिल मनोहर मोहिते (वय 28) यांची वाईट नजर होती. यावरूनच अनेकदा त्यांचे वाद देखील झाले होते. शुक्रवारी घरात कोणी नसल्याची संधी साधून दोन्ही आरोपी घरात घुसले. तसेच महिलेचा विनयभंग केला.
शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधून दोन्ही आरोपींनी घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. प्रकाश यांना ही बाब समजली व त्यांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही नराधमांनी प्रकाश यांना मारहाण सुरू केली. त्यांच्या छातीवर बसून बुक्क्यांनी मारहाण सुरू होती. या मारहाणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जागेवरच जीव गेला.
advertisement
पोलिसांकडून कारवाई
याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांत मनुष्यवध आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत लहान भाऊ संजय मोहिते याला अटक केली. शनिवारी रात्रीच भवन परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपी अनिल मोहिते याचा शोध सुरू होता.
दरम्यान, वाईट मार्गाला जाणाऱ्या भावाला अडवल्याने मोठ्याला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घरात ‘ती’ एकटीच, चुलता-पुतण्यानं संधी साधली, अडवायला आलेल्या स्वत:च्याच भावालाच संपवलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement