Mumbai : 85 वर्षांची महिला, आधी मुलासारखी मदत केली अन् शेवटी...;धक्कादायक प्रकाराने मुंबईत खळबळ
Last Updated:
Mumbai : मुंबईत 85 वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून बँक मॅनेजर दांपत्याने आधी मुलासारखी मदत केली. त्यानंतर असं काही घडतं की अख्या शहरात खळबळ उडाली आहे.
मुंबई : विश्वास हा प्रत्येक माणसाच्या नात्यांचा पाया असतो मात्र हाच विश्वास बऱ्याच वेळेस मोठ्या फसवणुकीचं कारण ठरतो. मुंबईतील दहिसर परिसरातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं 85 वर्षीय वृद्ध महिलेला बँक मॅनेजर दांपत्याने विश्वासात घेऊन असं मोठं कांड केलेलं आहे.
मॅनेजर मेहताचे भयानक कारस्थान
मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये मुकेश मेहता जो दहिसर शहरातील एका बँकेचा मॅनेजर आहे, त्याने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली सीमा शरीफ निजाम या वयोरुद्ध महिलेशी संपर्क साधला. त्याने हळूहळू त्यांचा विश्वास जिंकला. त्याने आपल्या पत्नीसह सुनीता मेहता हिला शेअर मार्केट एक्सपोर्ट म्हणून दाखवत गुंतवणुकीचे अनेक आकर्षक प्रस्ताव दिले. ज्यात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेत असं सांगत बऱ्याचदा त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
सुरुवातील वृद्ध महिलाने नकार दिला. पण मेहताने त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. ज्यात परदेशात असलेल्या मुलाला पैसे पाठवण्यात मदत केली तसेच घरातील बिलं भरलं असा गोष्टी केल्याने तो घरचाच सदस्य असल्यासारख वागू लागला. इथंच आरोपींना यश आले आणि त्यानंतर त्याने मोबाईल आणि बँक खातं लिंक करुन ईमेल आयडीवर नियंत्रणही मिळवलं.
advertisement
नंतर सेल ऑप्शन गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांनी तब्बल 76 लाख 50 हजार रुपये जमा केले. मात्र ही रक्कम प्रत्यक्षात गुंतवणुकीत न जाता मेहताच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आली होती. त्यानंतर त्याने 19 लाख परताव्याचंही आमिष दाखवलं पण फक्त 5 लाख रोख रुपये दिले आणि बाकीची रक्कम देण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली.
पैसे मागितल्यावर उलट महिलेची बदनामी करण्यात आली आणि त्यांच्या मुलालाही चुकीची माहिती देण्याचा प्रयत्नही झाला. अखेर नोव्हेंबर 2024 नंतर मेहताचं घर बंद असल्याचे दिसून आले. तपास गेला असता आणखी चार पीडित असल्याचे समोर आले.
advertisement
शेवटी बँक स्टेटमेंट तपासण्यात आले आणि ते सर्व पैस जय मेहताच्या खात्यात वळवल्याचे समोर आले. या प्रकरणी जय मेहता त्याची पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 9:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 85 वर्षांची महिला, आधी मुलासारखी मदत केली अन् शेवटी...;धक्कादायक प्रकाराने मुंबईत खळबळ









