2 तास 11 मिनिटांच्या या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना असे अनेक सीन्स आणि डायलॉग्स ऐकायला मिळतील, ज्यामुळे सर्वच थक्क होतील. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रिलीज झालेल्या या चित्रपटाचे कथानक तीन मित्रांभोवती फिरते. सख्ख्या भावांपेक्षाही घट्ट नातं या तिघांमध्ये आहे. बालपणीच्या एका दुर्घटनेमुळे, त्यांचा एक मित्र त्या परिसरातून दूर निघून जातो. जो तब्बल 18 वर्षांनंतर त्याच्या जुन्या मित्रांना तो पुन्हा त्या ठिकाणी भेटायला जातो. जेव्हा तो मित्र आपल्या तीन मित्रांना भेटण्यासाठी येतो, तेव्हा आपले मित्र कुठे आहेत? ते कोणत्या परिस्थितीचा सामना करतायत? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले.
advertisement
त्याचं बालपण जिथं गेलं, त्या ठिकाणी तो आल्यानंतर त्याला आपल्या मित्रांबद्दल कळालं. त्याचा मित्र पैसे कमावण्यासाठी संघर्ष करतोय, दुसरा जेलमध्ये बंद आहे, तिसर्याला बालपणापासूनच डब्लूडब्लूईच्या फायटिंगमध्ये आवड होती. म्हणून तो आपली आवड जोपासण्यासाठी त्याचा बिझनेस सुरू केला. त्यामुळे त्या तिघांच्याही मैत्रीमध्ये मोठी दरी निर्माण होते. यातूनच चित्रपटाच्या क्लायमेक्समध्ये मोठा ट्विस्ट येतो. चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲक्शन, कॉमेडी आणि थ्रीलर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा दुसरा तिसरा कोणताही चित्रपट नसून मल्याळम चित्रपट 'छट्टा पछा' (Chatha Pacha) आहे.
'छट्टा पछा' हा मल्याळम चित्रपट अलीकडेच 'नेटफ्लिक्स' ओटीटीवर रिलीज झाला आहे. रिलीज होताच काही वेळातच हा चित्रपट ओटीटीवर नंबर दोनवर ट्रेंड होऊ लागला आहे. अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना सेलिब्रिटी लोकांचे कॅमिओ पाहायला मिळत आहे. सध्या कॅमिओची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर आहे. या चित्रपटामध्येही असाच काहीसा प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेते मामूटी या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे चित्रपटामध्ये बराच ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या विकेंडला असा ॲक्शन, कॉमेडी आणि थ्रीलरने भरलेला चित्रपट बिल्कुल चुकवू नका.
