'छावा' मराठीत रिलीज होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यांनी X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या भेटीचाही फोटो शेअर केला.
'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांचं टेन्शन वाढलं, आता कमाईचं काय होणार?
‘छावा’ मराठीतही होणार रिलीज
advertisement
सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी X वर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "आज 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. 'छावा' चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकरही उपस्थित होते."
'छावा' मराठीत प्रदर्शित होणार असला तरी अद्याप याबाबत रिलीज डेट किंवा नवी कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र या माहितीने प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट विक्की कौशलच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. हिंदीमध्ये तुफान कमाई केल्यानंतर आता मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट त्यांच्याच भाषेत पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
दरम्यान, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे, आणि तिकीट मिळवणेही कठीण झाले आहे. पहिल्या तीन दिवसांतच 'छावा'ने तब्बल 116.5 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. 2025 चा मोठा ओपनर हा सिनेमा ठरला आहे.