TRENDING:

प्रदर्शनापूर्वीच ‘धुरंधर 2’ची कमाईमध्ये गगनभारी, पहिल्या भागापेक्षा निर्मात्यांची दुप्पट कमाई

Last Updated:

'धुरंधर'प्रमाणेच 'धुरंधर: द रिव्हेंज' सुद्धा जबरदस्त कमाई केली आहे. एकही तिकिटाची विक्री न करता 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या नावावर करोडोंची कमाई केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' येत्या मार्च महिन्यात रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहेत. 'धुरंधर'प्रमाणेच 'धुरंधर: द रिव्हेंज' सुद्धा जबरदस्त कमाई करणार आहे. एकही तिकिटाची विक्री न करता 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या नावावर करोडोंची कमाई झाली. नेमकी कशी ते जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

'धुरंधर'च्या घवघवीत यशानंतर 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या रिलीजपूर्वीच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ट्रेड इनसायडर्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’ने प्री रीलिजपूर्वी 150 कोटींचा नफा कमवला होता. ‘पिंकव्हिला’ने दिलेल्या माहितीनुसार, 20 कोटींसाठी ‘धुरंधर’चे म्युझिकल राईट 'सारेगमा'ला विकण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली. आता 'धुरंधर: द रिव्हेंज'चे म्युझिकल राईट 4 कोटींना टी- सीरिजला विकली आहे. म्युझिकल राईट्सनंतर ओटीटी राइट्स सुद्धा मोठ्या किंमतीला विकण्यात आले आहेत. 'धुरंधर' चित्रपटाचे ओटीटी राईट्स नेटफ्लिक्सने घेतले होते. ज्याचा करार 85 कोटींमध्ये झाली होती.

advertisement

पण, 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचे ओटीटी राईट्स नेटफ्लिक्सने घेतले नसून जिओ हॉटस्टारने घेतले आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचे ओटीटी राईट्स जिओ हॉटस्टारने 150 कोटींना विकत घेतले आहेत. ‘धुरंधर’ची कमाई पाहता 'धुरंधर: द रिव्हेंज' चे सॅटेलाइटचे राईट्स मोठ्या किमतीत विकले जाण्याची शक्यता आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागासाठी ‘स्टार गोल्ड’ने 50 कोटी दिले होते. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार 'धुरंधर: द रिव्हेंज' नॉन थिएटरीकल प्री रीलिजमधून 245 कोटींची कमाई सहज करेल. ‘धुरंधर’मुळे 'धुरंधर: द रिव्हेंज' चीही क्रेझ वाढली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंह सह अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. याचा दुसरा भाग ‘धुरंधर: द रिव्हेंज’ 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सीक्वेलमध्ये सर्व कलाकार पुन्हा त्यांच्या भूमिका साकारणार आहेत. यामध्ये काही नवीन कलाकारांचाही समावेश होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रदर्शनापूर्वीच ‘धुरंधर 2’ची कमाईमध्ये गगनभारी, पहिल्या भागापेक्षा निर्मात्यांची दुप्पट कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल