TRENDING:

"मी दोन्हीही चित्रपट पाहणार, पण...", 'टॉक्सिक' आणि 'धुरंदर 2'च्या क्लॅशेसवर प्रसिद्ध दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

Last Updated:

'धुरंदर: द रिव्हेंज' आणि 'टॉक्सिक' चित्रपटाच्या क्लॅशेसवर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्हीही चित्रपटांच्या दिग्दर्शकांना ते काय म्हणाले, जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मार्च महिन्यामध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या दोन दिग्गज कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. रणवीर सिंगचा 'धुरंदर: द रिव्हेंज' आणि यशचा 'टॉक्सिक' हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे. चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्यामुळे चित्रपट क्लॅश होण्याची भिती सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. आता अशातच चित्रपटाच्या क्लॅशेसवर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी भाष्य केलंय.
dhurandhar the revenge vs toxic filmmaker sanjay gupta comment on both movie box office clash
dhurandhar the revenge vs toxic filmmaker sanjay gupta comment on both movie box office clash
advertisement

'काँटे' आणि 'काबील' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी धुरंदर आणि टॉक्सिक हे दोन्हीही चित्रपट पाहणार आहे, पण दुर्दैवाने, ते एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. हे मोस्ट अवेटेड चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत असल्यामुळे ते एकमेकांच्या कमाईवर परिणाम करण्याची शक्यता आहे." यावेळी दिग्दर्शकांनी चित्रपट क्लॅशेसचं उदाहरण सुद्धा दिलं. 

advertisement

पुढे संजय गुप्ता म्हणाले की, "2017 साली मी दिग्दर्शन केलेली 'काबील' फिल्म आणि शाहरूख खानची 'रईस' फिल्म सुद्धा एकाच दिवशी रिलीज झाले होते. या दोन्हीही फिल्म क्लॅशेस झाल्या होत्या. जर तेव्हा हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या दिवशी रिलीज झाले असते, तर याचा दोघांनाही चांगला फायदा झाला असता. सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, आपला देश हा श्रीमंतांचा देश नाही. आपल्या इथल्या लोकांकडे जास्त पैसा नाही. ते एका महिन्यात एकाच वेळी दोन दोन चित्रपट पाहू शकणार नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी एक अर्थी दोन्हीही चित्रपटांपैकी एका चित्रपटाच्या दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचाच सल्ला दिला आहे. दरम्यान, येत्या 19 मार्चला रणवीर सिंगचा 'धुरंदर: द रिव्हेंज' आणि यशचा 'टॉक्सिक' हे दोन्हीही चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्हींपैकी एक चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
"मी दोन्हीही चित्रपट पाहणार, पण...", 'टॉक्सिक' आणि 'धुरंदर 2'च्या क्लॅशेसवर प्रसिद्ध दिग्दर्शकांची प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल