मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने काही क्रिएटिव्ह कारणांमुळे चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती आहे. अभिनेत्याने अचानक चित्रपटातून एक्झिट घेतल्यामुळे एक्सेल एंटरटेन्मेंटला करोडोंचे नुकसान झाले आहे. रणवीर सिंगने हे विचित्र पाऊल उचलल्यामुळे निर्मात्यांना तब्बल 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंडस्ट्रीतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगकडून चित्रपटाला ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. एक्सेल एन्टरटेन्मेटने 'डॉन 3'ची तयारी सुरू केली होती, परंतु ज्या पद्धतीने त्याने अचानक प्रोजेक्ट सोडला, त्यामुळे या मोठ्या नुकसानाची भरपाई कोण करेल? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्याने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
व्हरायटी इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रॉडक्शन हाऊसकडून शुटिंग लोकेशन्सवर प्री- प्रॉडक्शनचं कामही सुरू केलं होतं, त्यासाठी प्रॉडक्शन हाऊसने मोठ्या प्रमाणावर खर्चही केला होता. रणवीर सिंगने अचानक प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्यानंतर निर्मात्यांनी संबंधितांना पत्राच्या माध्यमातून तुम्ही इतर प्रोजेक्टसाठी काम करू शकता, अशी माहिती दिली. कारण, 'डॉन 3' चित्रपट बनणार नाहीये. प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने बॅनरला झालेल्या नुकसानाची भरपाई करावी, परंतु त्याने जवळजवळ हार मानली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "रणवीर सिंगने क्रिएटिव्ह स्टोरीच्या मतभेदांमुळे या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. शिवाय, अभिनेता स्क्रिप्टवरही नाराज होता. त्याने निर्मात्यांना स्क्रिप्टमध्ये सुधारणा करण्याची वारंवार विनंतीही केली होती. परंतु त्याला मिळत असलेल्या निकालांवर तो खूश नव्हता. दुसरीकडे, एक्सेल एंटरटेनमेंटचा दावा आहे की त्यांनी रणवीर सिंगच्या मंजुरीनंतरच प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू केले."
डॉन ३ भोवतीच्या वादानंतर, 40 कोटी रुपयांचे नुकसान कोण भरून देणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. निर्मात्यांचे मत आहे की, रणवीर सिंगने हे नुकसान केले आहे, पण त्यानेच नुकसानाची जबाबदारी नाकारली आहे.
