दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मिडिया पोस्ट शेअर करत, आदित्य धरच्या 'धुरंदर 2' चांगलेच कौतुक केले आहे. 'धुरंदर' पाहिल्यानंतर अगोदरच आदित्य धरचे राम गोपाल फॅन आहेत. पोस्टमध्ये, राम गोपाल यांनी 'धुरंदर 2' हा चित्रपट दिग्दर्शक गीता मोहनदास यांच्या 'टॉक्सिक' चित्रपटापेक्षा चांगला असेल, असं म्हटलं आहे. दिग्दर्शकांनी लांबलचक पोस्ट एक्सवर लिहिलेली आहे. पोस्टमध्ये त्यांनी 'धुरंदर 2'चे कौतुक केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'धुरंदर 2' चित्रपटाचे राम गोपाल यांनी कौतुक केले असून सध्या या कौतुकाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
शेअर केलेल्या पोस्टमध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिलं की, " 19 मार्चला रिलीज होणार्या 'धुरंदर 2' आणि 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये फरक असा आहे की, धुरंधर प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा आदर करतो, तर टॉक्सिक प्रेक्षकांना मूर्ख मानतो. 'केजीएफ 2' हा एक स्थानिक चित्रपट होता, जो मूर्ख लोकांसाठी बनवला गेला होता, तर 'धुरंधर' समजुतदार लोकांना लक्ष्य करत होता. आदित्य धर यांनी केव्हाच प्रेक्षकांना मूर्ख समजले नाही, ही बाब महत्त्वाची आहे. खरं तर, 'धुरंदर' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाला खूप जबरदस्त जोरदार प्रतिसाद दिला. 'हो, आम्ही खूप हुशार आहोत. लक्षात घेतल्याबद्दल धन्यवाद.' म्हणून, 19 मार्चला, जेव्हा जगभरातील थिएटर्सच्या लाईट्स बंद होतील, तेव्हा दोन डेव्हिड आणि दोन गोलियाथ एकमेकांशी लढतील."
यशचा 'टॉक्सिक' चित्रपट बराच चर्चेत आहे. त्याचा पहिला लूक आणि टीझर सोशल मीडियावर कमालीचा गाजला. 'केजीएफ 2' नंतर, यश हिंदी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. दरम्यान, धुरंधर हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. आता, या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे, तो पहिल्या चित्रपटापेक्षाही जास्त व्यवसाय करू शकेल असा विश्वास आहे. यशसोबत, 'टॉक्सिक'मध्ये कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत, नयनतारा आणि टोविनो थॉमस हे प्रेक्षक सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर 'धुरंदर 2'मध्ये, रणवीर सिंग व्यतिरिक्त, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अली खान सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
