TRENDING:

ही मैत्री की प्रेम? 'भाऊच्या धक्क्या'वर हायव्होल्टेज ड्रामा; रितेशसमोरच तन्वीने आयुषवर बेदम मारलं! VIDEO

Last Updated:

BBM6 Tanvi Kolte Ayush Sanjeev : नुकताच समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या वादाचे ढग फक्त टास्कपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर प्रत्येक क्षणाला कोणाचा पारा चढेल हे सांगणं आता कठीण झालंय. शनिवार आणि रविवार म्हणजे रितेश भाऊंच्या 'धक्क्या'चा वार, जिथे आठवडाभराचा हिशोब चुकता केला जातो. पण नुकताच समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे. घरामध्ये ज्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगायच्या, त्याच तन्वी आणि आयुषमध्ये आता ठिणगी पडली असून, तन्वीने चक्क रितेश देशमुख समोरच आयुषला मारलं आहे.
News18
News18
advertisement

पंचिंग बॅगऐवजी थेट आयुषवर प्रहार

नेमकं काय घडलं? तर रितेश भाऊंनी स्पर्धकांसाठी एक आगळावेगळा टास्क आणला होता. समोर एक पंचिंग बॅग होती आणि ज्या स्पर्धकाचा तुम्हाला सर्वात जास्त त्रास होतोय, त्याचा फोटो त्या बॅगवर लावून आपला राग व्यक्त करायचा होता. जेव्हा तन्वीची वेळ आली, तेव्हा तिने कोणा शत्रूचा नाही तर आपला जवळचा मित्र म्हणवणाऱ्या आयुषचा फोटो लावला.

advertisement

BBM6 मध्ये राकेश बापटचे राडे, इथे पुन्हा प्रेमात पडली Ex Wife! घटस्फोटाच्या 7 वर्षांनी रिद्धी बांधणार लग्नगाठ

तन्वी संतापून म्हणाली, "मी याला हजारवेळा सांगितलंय की मी तुझ्यामध्ये माझा बेस्ट फ्रेंड शोधतेय, पण याला काहीच कळत नाहीये." त्यावर आयुषनेही तितक्याच रोखठोकपणे उत्तर दिलं की, "मी तुला आधीच स्पष्ट केलंय की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही." आयुषचं हे वाक्य ऐकताच तन्वीचा संयम सुटला. तिने पंचिंग बॅग बाजूला सारली आणि थेट समोर बसलेल्या आयुषला मारलं. हा प्रकार पाहून स्वतः रितेश भाऊ आणि घरातील इतर सदस्यही अवाक झाले.

advertisement

मैत्री की प्रेम? प्रेक्षकांचे तर्कवितर्क

तन्वीचं हे वागणं पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. अनेकांना असं वाटतंय की हे केवळ मैत्रीचं भांडण नाही. काही प्रेक्षक मात्र तन्वीवर नाराज आहेत. "भाऊच्या धक्क्यावर असं कृत्य करणं तिला महागात पडू शकतं, ती घराबाहेर जाईल का?" असा प्रश्नही विचारला जातोय.

advertisement

आता रितेश भाऊ काय करणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अलंकापुरीची इंद्रायणी की ‘फेस’गंगा? Video पाहाल तर आळंदीकरांसारखंच बोलाल!
सर्व पहा

बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसा कधीच खपवून घेतली जात नाही, त्यातही हा प्रकार थेट रितेश देशमुख समोर घडला आहे. तन्वीला या कृत्यासाठी 'ब्लॅक कार्ड' मिळणार की तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार? आयुष खरोखरच तन्वीला मुद्दाम टाळतोय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात मिळणार आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
ही मैत्री की प्रेम? 'भाऊच्या धक्क्या'वर हायव्होल्टेज ड्रामा; रितेशसमोरच तन्वीने आयुषवर बेदम मारलं! VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल