TRENDING:

Rashmika- Vijay Wedding: 'विरोश'ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लग्नासाठी शुभेच्छा, थेट पत्र लिहितच रश्मिका- विजयला दिले आशीर्वाद

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'विरोश'ला लग्नासाठी आशिर्वाद दिले आहेत. त्यांनी आशिर्वाद दिल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
सध्या बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अलीकडेच या कपलने प्रेमाची कबुली दिली असून उद्या उदयपूरमध्ये हे कपल लग्नगाठ बांधणार आहे. रश्मिका आणि विजय त्यांच्या लग्नासाठी 'विरोश' असा टॅग वापरत आहे. दोन्हीही सेलिब्रिटींचे आई- वडील आणि नातेवाईक लग्नाच्या तयारीमध्ये आहेत. अनेक दिग्गज मंडळी या कपलला लग्नासाठी आशिर्वाद देत आहेत. आता अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरूषला लग्नासाठी आशिर्वाद दिले आहेत. त्यांनी आशिर्वाद दिल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
prime minister narendra modi sends warm wishes to vijay deverakonda and rashmika mandanna
prime minister narendra modi sends warm wishes to vijay deverakonda and rashmika mandanna
advertisement

विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशीर्वाद दिल्याचं पत्र शेअर केलेलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 फेब्रुवारी 2026) पत्राच्या माध्यमातून या स्टार कपलला आशीर्वाद दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी या कपलला आशीर्वाद दिल्यामुळे हे कपल सध्या चांगलंच सोशल मीडियावर आले आहे. विजय देवेराकोंडाच्या आई- वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या लग्नाच्या आमंत्रणाला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला. कपलला आशीर्वाद देताना देवरकोंडाच्या कुटुंबाचे आणि मंदान्ना कुटुंबाचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी या कपलला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या असून जोडप्याचे भविष्य आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

advertisement

पंतप्रधानांनी पत्रामध्ये लिहिले की, "26 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्‍या विजय आणि रश्मिकाच्या लग्नासाठी आमंत्रित केल्यासाठी मला आनंद होत आहे. या खरोखरच आनंददायी आणि शुभ प्रसंगी देवेराकोंडा आणि मंदान्ना कुटुंबियांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. विजय आणि रश्मिकाच्या आयुष्यातील एका नवीन सुंदर अध्यायाची सुरुवात होत आहे. हे नव विवाहित दाम्पत्य सप्तपदी घेत एकमेकांना आयुष्यभरासाठी वचनबद्ध होणार आहेत. त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा." असे पंतप्रधान मोदींनी पत्रामध्ये लिहिले. उदयपूरमधील मेमेंटोसच्या आयटीसी हॉटेल्समध्ये हे सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्नाचं ठिकाण त्यांच्या शाही लूक आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय?
सर्व पहा

विजय आणि रश्मिकाचा लग्नसोहळा काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. टॉलिवूडसह बॉलिवूडमधील कोणकोणते सेलिब्रिटी या कपलच्या लग्नासाठी उपस्थित राहतील? हे अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय काही राजकीय मंडळीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच, 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये विजय आणि रश्मिका लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाचा अधिकृत वेळ अद्याप समोर आलेली नाही. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, विजय आणि रश्मिका 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika- Vijay Wedding: 'विरोश'ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लग्नासाठी शुभेच्छा, थेट पत्र लिहितच रश्मिका- विजयला दिले आशीर्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल