advertisement

Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय? टिटवाळ्यातील प्रसिद्ध मंदिरातील गुरूजींनी दिली माहिती, Video

Last Updated:

दरवर्षी होळी ही ठराविक तारखेनुसार साजरी केली जाते. परंतु या वर्षी होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्याने नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

+
होलिका

होलिका दहन 

ठाणे : दरवर्षी होळी ही ठराविक तारखेनुसार साजरी केली जाते. परंतु या वर्षी होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्याने नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने ते पाळणे गरजेचे आहे. परंतु होळी यावर्षी 2 मार्चला न करता 3 मार्च म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी साजरी केली जाणार असल्याने संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 च्या दरम्यान होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे. या वर्षी होळीवर चंद्रग्रहणाचा सावलीचा परिणाम असल्याने योग्य मुहूर्तावरच पूजा आणि दहन करणे महत्त्वाचे मानले जाते. याबद्दलच ठाण्यातील टिटवाळा मंदिर गुरूजी गणेश अरविंद बिवळकर यांनी माहिती दिली आहे.
होलिका दहनाच्या वेळी भद्रा काळ टाळला जातो. त्यामुळे यावर्षी 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे, ग्रहण काळात विशेष काळजी घेणे आणि योग्य वेळी होळी पेटवणे शुभ मानले जाते. 2 मार्चच्या रात्री देखील काही ठिकाणी होळी पेटवण्याची परंपरा आहे, परंतु पंचांगानुसार 3 मार्च हा मुख्य दिवस आहे म्हणून या वर्षी होलिका दहनाचा कार्यक्रम मुहूर्तानुसार सर्वत्र केला जाईल.
advertisement
होलिका दहन तारीख: 3 मार्च 2036 (मंगळवार)
शुभ मुहूर्त: संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50
अवधी: 2 तास 28 मिनिटे
धुलीवंदन (रंगवली होळी): 4 मार्च 2026 (बुधवार)
फाल्गुन पौर्णिमा: तारीख आणि मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 दिवसांवर विभागली गेली आहे.
होलिका दहन तारीख: 3 मार्च 2036 (मंगळवार)
शुभ मुहूर्त: संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50
advertisement
अवधी: 2 तास 28 मिनिटे
धुलीवंदन (रंगवली होळी): 4 मार्च 2026 (बुधवार)
उदयतिथीनुसार, 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी सकाळी 5 वाजून 19 मिनिटे ते 6 वाजून 8 मिनिटांपर्यंतचा ब्रह्म मुहूर्त अतिशय शुभ आहे.
चंद्रग्रहणामुळे होळी दहनाचा संभ्रम
3 मार्च रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागत आहे. चंद्रोदयाची वेळ सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांची असून याच सुमारास ग्रहण काळात बदल दिसून येतील. यामुळे होलिका दहनासाठी दोन पर्याय समोर येत आहेत. त्यातीलच उत्तम पर्याय म्हणून 3 मार्च ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय? टिटवाळ्यातील प्रसिद्ध मंदिरातील गुरूजींनी दिली माहिती, Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement