advertisement

Running : धावणं सुरु करण्याआधी करा फिटनेस टेस्ट, योग्य प्रशिक्षकाचं मार्गदर्शनही आहे गरजेचं

Last Updated:

धावायला सुरुवात करायची म्हणजे त्यासाठी पूर्वतयारी हवी. किती वेळ देऊ शकता, यात कोणते धोके असू शकतात, धावण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार असावा, कोणत्या प्रकारचे शूज असावेत या सगळ्या मुद्द्यांचा आवर्जून विचार करा.

News18
News18
मुंबई : चालण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतातच. तसंच हल्ली फिटनेससाठी, खूप जण धावण्याचा व्यायाम करायला पसंती देतात. शरीरयष्टी सुदृढ होण्यासाठी धावणं हा खूप उपयुक्त व्यायाम आहे.
व्यायाम म्हणून धावायला सुरुवात करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा आहे फिटनेस. सर्वप्रथम फिटनेसकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. धावायला सुरुवात करायची म्हणजे त्यासाठी पूर्वतयारी हवी. किती वेळ देऊ शकता, यात कोणते धोके असू शकतात, धावण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार असावा, कोणत्या प्रकारचे शूज असावेत या सगळ्या मुद्द्यांचा आवर्जून विचार करा.
आतडं निरोगी असणं म्हणजे शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी सकारात्मक बाब. जर्नल ऑफ स्पोर्ट अँड हेल्थ सायन्सेसमधे प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आतड्यातील मायक्रोबायोम सूज आणि स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. धावण्यासारख्या तीव्र व्यायामामुळे, हायड्रेशन आणि चयापचय सुधारतं.
advertisement
म्हणजेच धावतानाही तुम्हाला थकवा जाणवत नाही, ऊर्जा टिकवून ठेवता आणि फिटनेस लवकर सुधारतो. आपल्या आतड्यांचं आरोग्य आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी जवळून जोडलेलं आहे. म्हणून, ज्या पदार्थांमुळे निरोगी आतड्यातील बॅक्टेरियांना आधार मिळेल असे पदार्थ खावेत.
Mobility म्हणजेच गतिशीलता. धावण्यामुळे हालचाली चांगल्या होतात. हालचाल करण्यास त्रास होत असेल तर याचा अर्थ स्नायूंमधे अशक्तपणा असू शकतो. वयानुसार हालचाल कमी होतात पण दीर्घकाळ निष्क्रियतेमुळे सकाळी अंथरुणातून उठणं, चालणं किंवा पायऱ्या चढणं कठीण होतं. पण दुखापतीचा धोका देखील वाढू शकतो. चांगल्या शरीरयष्टीसाठी गतिशीलता म्हणजेच Mobility आवश्यक आहे आणि पर्यायानं नियमित व्यायामही.
advertisement
उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग असेल तर धावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुडघे किंवा घोट्यात वेदना किंवा संधिवात असेल तर धावावं की नाही याबद्दल डॉक्टर सल्ला देतील. ते धावण्याव्यतिरिक्त इतर व्यायाम सुचवू शकतात.
विशीत-तिशीत धावण्यासाठी शरीराला विशिष्ट आकार देण्यासाठी तुलनेनं कमी प्रयत्न करावे लागतात, पण जर तुम्ही धावण्यासाठी निश्चित रणनीती असेल, तर तुम्ही चाळिशीतही धावू शकता किंवा लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन करू शकता.
advertisement
यासाठी योग्य प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागेल. जो तुम्हाला नियमित धावण्याबद्दल सल्ला देईल, चालण्यापासून सुरुवात करून, नंतर वेगानं चालणं किंवा जॉगिंग करणं. यासाठी दररोज एक विशिष्ट वेळ बाजूला ठेवा. यासाठीचं योग्य प्रशिक्षण घ्या. यामुळे दुखापत किंवा इतर जोखीम कमी होऊ शकते.
शरीर सहा महिन्यांत मॅरेथॉनसाठी तयार होऊ शकतं. पण, हे वैयक्तिक क्षमतेवर आणि सातत्यावर अवलंबून असतं. यासाठी प्रत्येक व्यायामापूर्वी वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग करा. मॅरेथॉननंतर हलका व्यायाम आणि कुल डाऊन व्हा.
advertisement
धावल्यानंतर किंवा कोणत्याही हालचालीनंतर जर तुम्हाला पोटात, गुडघ्यात किंवा घोट्यात वेदना होत असतील किंवा तुम्हाला कोणत्याही दिवशी धावण्याची इच्छा नसेल, तर शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
निर्धारित वेळेत तुमची इच्छित उद्दिष्टे साध्य झाली नाहीत तरीही ताण घेऊ नका.
आहार - नियमितपणे संपूर्ण धान्य आणि कडधान्यं खा, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं आणि चांगल्या चरबीचे ते चांगले स्रोत आहेत. भरपूर हंगामी फळं आणि भाज्या खा. डाएटसाठीही प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.
advertisement
हायड्रेशन - धावण्यामुळे येणाऱ्या घामासाठी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोलाइट्स जास्त काळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
महत्त्वाच्या टिप्स -
धावण्यापूर्वी, घाई करू नका.
असमान पृष्ठभागावर धावल्यानं दुखापत होण्याचा किंवा पडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, नेहमी सपाट जमिनीवर धावण्याचा पर्याय निवडा.
advertisement
धावण्याचे शूज योग्य असावेत. अन्यथा, घोट्यांवर आणि कधीकधी खांद्यावर दाब येऊ शकतो आणि तुम्हाला दुखापत होऊन वेदना होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Running : धावणं सुरु करण्याआधी करा फिटनेस टेस्ट, योग्य प्रशिक्षकाचं मार्गदर्शनही आहे गरजेचं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement