चंद्रग्रहणचं सावटही बिघडवू शकत नाही 'या' 3 राशींच्या नशिबाचा खेळ, मार्चमध्ये होणार तगडी कमाई!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
येणारा 3 मार्च 2026 हा दिवस खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे.
काही दिवसांनी मार्च महिन्याची सुरुवात होईल. हा महिना अनेक प्रकारे खास असेल. या महिन्यात सूर्य आणि शुक्र मीन राशीत संक्रमण करतील, जिथे शनिदेव आधीच वास्तव्य करत आहेत. मीन राशीत सूर्य, शुक्र आणि शनीची त्रिग्रह युती देखील होईल. येणारा 3 मार्च 2026 हा दिवस खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे, हे ग्रहण होळीच्या दिवशी येत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार, हे ग्रहण सर्वच राशींसाठी अशुभ नाही. काही ग्रहांच्या शुभ युतीमुळे आणि शुक्राच्या उच्च स्थितीमुळे वृषभ, तूळ आणि मीन या तीन राशींसाठी मार्च महिना 'जॅकपॉट' ठरणार आहे. ग्रहणाच्या सावटातही या राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून त्यांना प्रगतीचे नवे मार्ग सापडतील.
advertisement
3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. जरी ग्रहणामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असली, तरी 2 मार्च रोजी होणारे शुक्राचे मीन राशीतील संक्रमण काही राशींसाठी 'राजयोग' घेऊन येत आहे. जेव्हा शुक्र स्वतःच्या उच्च राशीत असतो, तेव्हा तो ग्रहणदोष देखील कमी करण्याची ताकद ठेवतो. यामुळे काही राशींना ग्रहणाचा फटका न बसता उलट फायदाच होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement







