'उठ, अॅक्टिंग करू नकोस', कोमात असलेल्या 'शो मॅन'ला पाहून हादरले होते दिलीप कुमार; शेवटच्या भेटीची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Raj Kapoor - Dilip Kumar : राज कपूर यांच्या मृत्यूच्या काही तास आधी ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा राज कपूर कोमात होते. दोघांच्या भेटीचा हा किस्सा खूपच हृदयस्पर्शी आहे.
राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यातील मैत्री चित्रपटसृष्टीत सर्वश्रृत आहे. त्यांच्या व्यावसायिक शत्रुत्व असूनही एक भावनिक नातं होतं. जेव्हा राज कपूर कोमात होते तेव्हा दिलीप कुमार उद्ध्वस्त झाले होते. त्यांची शेवटची भेट कशी होती? त्या दिवशी रुग्णालयात काय घडले? ती फक्त एक भेट नव्हती तर चित्रपटसृष्टीतील दोन महान कलाकारांमधील नात्याची कहाणी होतीय जी पडद्याच्या ग्लॅमरच्या पलीकडे गेली होती.
advertisement
2 जून 1988 साली शांत रुग्णालयाच्या खोलीत वेळ थांबल्यासारखी वाटत होती. शोमन राज कपूर जन्म आणि मृत्यूची लढाई लढत होते. ते शांत पडून होते. दिलीप कुमार त्यांना पाहायला आले आण आपल्या मित्राची अशी अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमिन निसटली. थरथरत्या हातांनी त्याने राज कपूरचा हात धरला आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाले, "राज, असं वागू नकोस... उठ. आज मला पुन्हा उशीर झाला आहे. प्लिज मला माफ करा." हा फक्त एक संवाद नव्हता तर आठवणी, प्रेम आणि वियोगाच्या भीतीने भरलेल्या दशकांची जुनी मैत्री होती.
advertisement
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात, असे दोन स्टार होते ज्यांची मैत्री पडद्यावरच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षाही जास्त होती. ते होते 'शोमन' राज कपूर आणि 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार. 2 जून 1988 रोजी राज कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचाच नाही तर 58 वर्षांच्या मैत्रीचाही अंत झाला. त्यांच्या शेवटच्या भेटीची कहाणी अजूनही कोणाच्याही डोळ्यात पाणी आणते.
advertisement
advertisement
advertisement
राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर यांनी दिलीप कुमार यांच्या चरित्रात या भावनिक क्षणाचं वर्णन केलं आहे. ऋषी कपूर यांनी लिहिले आहे की, मला स्पष्टपणे आठवते की ते (दिलीप कुमार) बाबा बेशुद्धावस्थेत असलेल्या खोलीत कसे गेले. त्यांनी खुर्ची उचलली, बाबांचा हात धरला आणि सुरुवात केली, 'राज, आज मला पुन्हा उशीर झाला. मला माफ करा... मला माहित आहे की तुम्हाला लाइमलाइटमध्ये राहायला आवडते. पुरे झाली अँक्टिंग आता उठा आणि बसा, माझं ऐक.'
advertisement
advertisement
दिलीप कुमार यांनी शेवटचा प्रयत्न केला, "राज, मैं ले जान है तुसी पेशावर दे घर दे आंगन विच" (राज, मला तुझ्यासोबत पेशावरमधील तुझ्या घराच्या अंगणात घेऊन जा). ऋषी कपूर यांनी लिहिले की हे बोलता बोलता त्यांचा आवाज गुदमरला आणि ते ढसाढसा रडू लागले. खोलीतून बाहेर पडताच ते दाराशी थांबले आणि त्यांच्या निर्जीव मित्राकडे शेवटची नजर टाकली. त्याच संध्याकाळी रोजी राज कपूर यांचं निधन झालं.







