चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुरमार संतोषी करत असून निर्मिती आमिर खान करतोय. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थात 13 ऑगस्ट 2026 रोजी हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होणार आहे. 'लाहोर 1947' या बहुचर्चित चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड इंडस्ट्रीतले तीन दिग्गज मंडळी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. सनी देओल, आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी असे तिघं एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहते चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
advertisement
दरम्यान, 'लाहोर 1947' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, सनी देओल दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी राजकुमार संतोषी यांच्याकडे देण्यात आली आहे. तर आमिर खान या बहुचर्चित चित्रपटाचा निर्माता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलताना आमिर खानने भावनिक आठवण शेअर केली. त्याने सांगितले की, " 'लाहोर 1947' चित्रपटाची कथा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना खूप आवडली होती. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर तो पाहण्यासाठी धर्मेंद्र आपल्यात हवे होते." धर्मेंद्र यांच्या आठवणीमध्ये संपूर्ण चित्रपटाची टीम यावेळी भावूक झाली होती. 'गदर 2' नंतर 'लाहोर 1947'च्या माध्यमातून पुन्हा सनी देओलचा चाहत्यांना बेधडक लूक पाहायला मिळणार आहे.
'लाहोर 1947' चित्रपटाचे कथानक सध्याच्या घडीला फारच महत्त्वाचे मानले जात आहे. 2026 या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. 'बॉर्डर 2' मुळे सध्या यशाच्या शिखरावर असताना सनीच्या चाहत्यांच्या समोर 'लाहोर 1947' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 'लाहोर 1947' चित्रपटाची स्टारकास्ट देखील अतिशय तगडी आहे. सनी देओलसोबत या चित्रपटात फार मोठ्या ब्रेकनंतर प्रीती झिंटा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्यासोबतच शबाना आझमी आणि सनीचा मुलगा करण देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे संगीतकार ए.आर. रहमान आणि गीतकार जावेद अख्तर या जोडीची जादू अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
