TRENDING:

Ramayana Movie: विक्रांत मेस्सीने 'रामायण' चित्रपटातून एक्झिट का घेतली? थोडक्यातच सर्व काही सांगितलं

Last Updated:

'रामायण' चित्रपटातून अभिनेता विक्रांत मेस्सीने एक्झिट घेतल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. आता अशातच विक्रांत मेस्सीने स्वत: इन्स्टा स्टोरी लिहित त्याने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितेश तिवारी यांच्या 'रामायण'या अपकमिंग चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. बिगबजेट आणि या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'रामायण' चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने एक्झिट घेतल्याचे वृत्त होतं. चित्रपटातून अभिनेत्याच्या एक्झिटची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. आता अशातच विक्रांत मेस्सीने स्वत: इन्स्टा स्टोरी लिहित त्याने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे, नेमकं अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिलंय? जाणून घेऊयात...
News18
News18
advertisement

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. जेव्हा विक्रांत मेस्सीने चित्रपटातून एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली होती, त्याचवेळी विक्रांतची भूमिका कोण साकारणार? याची माहितीही समोर आली होती. अलिकडेच राघव जुयाल रावणाचा मोठा मुलगा मेघनादची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आली होती. ही भूमिका सुरुवातीला विक्रांत मेस्सीला ऑफर करण्यात आली होती, परंतु त्याने चित्रपटात काही काम केलं नाही. विक्रांतने इन्स्टाग्रामवर अफवा फेटाळून लावत पोस्टमध्ये लिहिलेय की, "मी कधीही या चित्रपटाचा भाग नव्हतो. बातम्या देण्यापूर्वी मीडियाने आपण बरोबर देतोय का, याची माहिती तपासायला हवी होती."

advertisement

"मी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. राघव जुयालने ही भूमिका लगेच स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राघवची तब्येत बरी नाहीये, तो बरा झाल्यानंतर शुटिंगसाठी सज्ज होईल. चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे, तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे." अशी पोस्ट विक्रांत मेस्सीने लिहिलेली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे, साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत, रकुल प्रीत सिंह शूर्पणखाच्या भूमिकेत आणि अरुण गोविल दशरथाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

रणवीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण' चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक अद्याप समोर आलेला नाही. पण सोशल मीडियावर चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, जे पाहून चाहते चित्रपटासाठी फारच उत्साहित आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त, रणबीर कपूर 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातही दिसणार आहे. रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Ramayana Movie: विक्रांत मेस्सीने 'रामायण' चित्रपटातून एक्झिट का घेतली? थोडक्यातच सर्व काही सांगितलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल